सुप्रिया सुळे यांच्याकडे 39 कोटींची मालमत्ता

पाच वर्षांत 8 कोटींची वाढ : सुळे कुटुंबियांकडे एकही वाहन नाही

पुणे – बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याकडे 39 कोटी 67 लाख 36 हजार रुपयांची मालमत्ता आहे. तर पती सदानंद सुळे यांच्याकडे 88 कोटी 11 लाख 30 हजार रुपयांची, मुलगी रेवती यांच्याकडे 8 कोटी 92 लाख आणि मुलगा विजय यांच्या नावावर 4 कोटी 15 लाख रुपयांची मालमत्ता आहे. तसेच, सुप्रिया सुळे यांना 55 लाख रुपये देणे असून त्यांनी पार्थ पवार यांच्याकडून 20 लाख रुपये; तर सुनेत्रा पवार यांच्याकडून 35 लाख रुपये घेतलेले आहेत. उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात ही माहिती नमूद केली आहे. तसेच, मागील पाच वर्षांत सुप्रिया सुळे यांच्या मालमत्तेमध्ये 8 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सुप्रिया सुळे यांच्याकडे रोख रक्‍कम 28 हजार 770 रुपये, पती सदानंद सुळे यांच्याकडे 23 हजार 50 रुपये, मुलगी रेवती यांच्याकडे 28 हजार 900 रुपये आणि मुलगा विजय यांच्याकडे 13 हजार 600 रुपये इतकी रोख रक्कम आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे 2 कोटी 83 लाख 20 हजार रुपयांच्या मुदतठेवी आहेत. तर शेअर्समध्ये 7 कोटी 77 लाख रुपयांची गुंतवणूक, राष्ट्रीय बचत योजना आणि पोस्ट खात्यामध्ये 7 लाख 13 हजार 500 रुपयांची गुंतवणूक आहे. सुप्रिया सुळे यांच्या विदेशी बॅंकांमध्ये ठेवी असून त्याची रक्कम 2 कोटी 14 लाख रुपये इतकी आहे. सुळे यांच्याकडे 52 लाख 54 हजार किंमतीचे सोने, 2 लाख 67 हजार रुपयांची चांदी आणि 1 कोटी 69 लाख रुपयांचे हिरे आहेत. सुळे कुटुंबियांकडे एकही वाहन नसल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे.

सुप्रिया सुळे यांच्या नावावर बारामती तालुक्‍यात माळेगाव आणि ढेकळवाडी येथे जमीन असून त्याची किंमत 1 कोटी 3 लाख 6 हजार रुपये इतकी आहे. मुंबई येथे 2 हजार 765 चौरस फुटांची सदनिका, कोरेगाव पार्क येथे 2 हजार 541 चौरस फुटांची सदनिका आहे. या स्थावर मालमत्तेची एकूण किंमत 18 कोटी 40 लाख रुपयांची आहे.

सदानंद सुळे यांच्याकडे 83 कोटी 96 लाख 24 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. यामध्ये 95 लाख रुपयांची मुदतठेवी आहे. तर विदेशी बॅंकांमध्ये 4 कोटी 35 लाखांची गुंतवणूक आहे. 1 कोटी 85 लाख रुपयांचे सोने, चांदी आणि हिरे असे जडजवाहीर आहे. सदानंद सुळे यांच्या नावावर जमीन नसून मोदीबाग येथे 4 हजार 442 चौरस फुटांची सदनिका आहे. त्याची किंमत 4 कोटी 15 लाख रुपये इतकी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
1 Comment
  1. Maj Gen S C N Jatar, Retd says

    ही फक्त ज़ाहिर केलेली!

Leave A Reply

Your email address will not be published.