Supreme Court : हिंदी दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयाची मोठी घोषणा !
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) हिंदी दिनानिमित्त लवकरच जन माहिती सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) हिंदी दिनानिमित्त लवकरच जन माहिती सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत, न्यायालयाचे महत्त्वाचे निर्णय आणि आदेशांचा सारांश सोप्या हिंदीमध्ये लहान ऑडिओ आणि व्हिडिओ बुलेटिनद्वारे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवला जाईल.
म्हणजेच, ज्या लोकांना कायदेशीर भाषेत लिहिलेले निर्णय वाचण्यात आणि समजून घेण्यात अडचण येते, ते त्यांना ऐकून आणि पाहूनही समजू शकतील. या उपक्रमाचा उद्देश सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) निर्णय सामान्य लोकांना समजून देणे हा आहे.
जन माहिती सेवा हिंदीतून सुरू होईल आणि नंतर ही सेवा इतर भारतीय भाषांमध्येही उपलब्ध करून दिली जाईल. न्यायालयाने या उपक्रमात दिव्यांग व्यक्तींपर्यंत न्यायिक माहितीची सोपी पोहोच सुनिश्चित करण्यालाही विशेष महत्त्व दिले आहे.
न्याय मिळवण्याची प्रक्रिया अधिक सर्वसमावेशक करणे आणि भारतीय भाषांना मिळणारा सन्मान व न्यायालयीन माहितीचा जनतेपर्यंत प्रसार यांचा परस्पर संबंध जोडणे हा यामागचा उद्देश आहे.
साध्या भाषेचा वापर तसेच ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपातील माहितीमुळे अशा लोकांनाही फायदा होईल ज्यांना लांबलचक कायदेशीर कागदपत्रे वाचणे किंवा समजून घेणे कठीण जाते, असे एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ही सेवा सुरुवातीला हिंदी भाषेत सुरू केली जाईल आणि टप्प्याटप्प्याने ती इतर भारतीय भाषांमध्येही उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच काम हाती घेतले जाईल.
या उपक्रमामुळे देशातील विविध भाषिक क्षेत्रांतील नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) महत्त्वपूर्ण निकालांबाबतची संक्षिप्त आणि सहज समजण्याजोगी माहिती त्यांच्या स्वतःच्या भाषेत मिळवणे शक्य होणार आहे.






