रेडा – गोखळी (ता. इंदापूर) येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने 6 हजार गोरगरीब कुटुंबांना पत्रकार संघाच्या माध्यमातून संकटाच्या काळात आधार मिळाला आहे, असे मत जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व सामाजिक संस्था सीवायडीए पुणे, इंदापूर शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने गरीब, गरजू व शेतमजूर दिव्यांग कुटुंबीयांना मोफत अन्नधान्याचे व वस्तूंच्या किटचे वाटप पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे, तसेच सीवायडीएचे संचालक प्रवीण जाधव यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुकाध्यक्ष नीलकंठ मोहिते यांसह विविध मान्यवर उपस्थित होते. गोखळी गावच्या सरपंच अलका पोळ, उपसरपंच तुकाराम वाघमोडे, सदस्य बापूराव पोळ, बाळासाहेब महारनवर, ग्रामसेवक भोरे भाऊसाहेब, माऊली वाघमोडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.