मुंबई – भारताने जिंकलेल्या पहिल्या क्रिकेट विश्वचषकावर आधारलेला ’83’ सिनेमा नुकताच थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. हा सिनेमा माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या जीवनावर आधारित असून, सिनेमात 25 जून 1983 च्या विश्वचषक स्पर्धेतील घटना दाखविण्यात आली आहे.
1983 मध्ये भारतानं 2 वेळा विश्वचषक विजेत्या वेस्ट इंडिजचा 43 धावांनी पराभव करून प्रथमच विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न पूर्ण केलं. यावेळी भारताच्या विजयावर कोणाचाही विश्वास नव्हता. पण, भारताच्या त्या ऐतिहासिक विजयानं जागतिक क्रिकेटमध्ये भारताची ओळख तर झालीच, पण त्या विजयानंतर भारतीय क्रिकेटचं नवे पर्व सुरू झालं. आणि याच संपूर्ण घटनेवर हा सिनेमा आधारित आहे.
सध्या सगळीकडेच ’83’ सिनेमाचा बोलबाला असून, सर्वच सेलिब्रिटींनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे. संपूर्ण टीमच्या अभिनयापासून ते दिग्दर्शक कबीर खानच्या दिग्दर्शनापर्यंत सर्वच गोष्टींवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान नुकतंच दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे सुपरस्टार ‘रजनीकांत’ यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
#83TheMovie wow 👏🏻👏🏻 what a movie… magnificent!!! Many congratulations to the producers @kabirkhankk @therealkapildev @RanveerOfficial @JiivaOfficial and all the cast and crew …
— Rajinikanth (@rajinikanth) December 28, 2021
नुकतंच रजनीकांत यांनी 83 हा सिनेमा पाहिला. यानंतर त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवर ट्वीट करत याबाबत प्रतिक्रिया दिली. यावेळी रजनीकांत म्हणाले, “#83TheMovie वाह काय सिनेमा आहे….शानदार!!! निर्माते, कलाकार आणि क्रू यांचे खूप खूप अभिनंदन, असे ट्वीट त्यांनी केले आहे. त्यासोबत त्यांनी याद्वारे कबीर खान, कपिल देव, रणवीर सिंग यांना टॅग करत त्यांचे कौतुक केले आहेत. सध्या रजनीकांत यांचे हे ट्विट तुफान व्हायरल होत आहे.