Mayanti Langer | सुपरमॉम मयंती करणार थाटात पुनरागमन

मुंबई – महिला समालोचकांमध्ये आपले भाषाप्रभुत्व सिद्ध केलेली पण मातृत्वाचा आनंद साजरा करण्यासाठी गेली दोन वर्षे क्रिकेट समालोचनापासून दूर राहिलेली सुपरमॉम मयंती लॅंगर यंदाच्या आययपीएल स्पर्धेत थाटात पुनरागमन करण्यासाठी सज्ज बनली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेट जगतातील आजी-माजी दीग्गज क्रिकेटपटूंशी सहजसुंदर संवाद साधण्याच्या तीच्या हातोटीमुळे खूप कमी वेळात ती चाहत्यांमध्येही तुफान लोकप्रीय झाली होती.
तीच्या टॉक शोचे टीआरपी एखाद्या मालिका व चित्रपटांपेक्षाही जास्त ठरत होते. खरेतर पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या क्रिकेट समालोचनाच्या जगतात तीने स्वत:ची वेगळी ओळख व शैली निर्माण केली. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून ती आयपीएलच नव्हे तर टॉक शोपासूनही लांब होती.
एक सर्वसामान्य टेलिव्हिजन अँकर ते यशस्वी समालोचक असा प्रवास करताना भारतीय संघाचा माजी आंतराष्ट्रीय क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नी याच्याशी तीचा विवाह झाला. आता यंदाच्या मोसमापासून ती पुन्हा स्टार स्पोर्टसच्या पथकाचा भाग होणार आहे.
मातृत्वाचा आनंद
मयंती आई बनली असून मुलाच्या जन्मानंतर त्याच्याकडे पूर्ण लक्ष देण्यासाठी तीने दोन वर्षांचा ब्रेक घेतला होता. दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांपर्यंत खेळाचे बारकावे पोहोचवण्यासाठी लवकरच मैदानात परतत आहे, असे ट्विट मयंतीनेच केले असून लाखो चाहत्यांनीही तीच्या ट्विटला लाईक केले आहे. यंदाच्या मोसमात मयंतीकडूनच प्रेरणा घेत यशस्वी अँकर झालेल्या संजना गणेशन, तान्या पुरोहित तसेच नेरोली मेडोजही स्पर्धेसाठी सज्ज बनल्या आहेत.





