सनराइजर्स सुपरफास्ट…! हेनरिक क्लासेनचे दमदार शतक
Updated On:

हैदराबाद- आयपीएल 2023 चा हंगाम हा शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून प्ले ऑफ मध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी सर्व संघांसाठी प्रत्येक सामना महत्वाचा आहे अशातच आजचा सामना हा रॉयल्स चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद असा रंगत असून हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियम वर खेळवला जात आहे.
सनरायझर्स हैदराबाद चा संघ हा प्लेऑफ च्या शर्यतीतुन बाहेर पडला असून रॉयल्स चॅलेंजर्स बंगलोरसाठी आजचा सामना जिंकणे अनिवार्य आहे. सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला विजयासाठी 187 धावांचे लक्ष्य दिले. हैदराबादचा स्टार फलंदाज हेनरिक क्लासेनने 51बॉल मध्ये 104 धाव करत दमदार शतक साकारले आहे.





