Border 2 Movie | बहुप्रतिक्षित ‘बॉर्डर-2’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता वरुण धवनने काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशातील झाशी येथे या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. आता अभिनेता सनी देओल देखील वरूणसोबत शूटिंगमध्ये सहभागी झाला आहे.
सनी देओलने झाशी येथे चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. टी-सीरिजने इंस्टाग्रामवर सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये वरुण आणि सनी देओलसोबत ‘बॉर्डर 2’चे दिग्दर्शक अनुराग सिंग, निर्माते भूषण कुमार, निधी दत्ता आणि सह-निर्माते शिव चानना आणि बिनॉय गांधी हे दिसत आहेत.
या चित्रपटाचे शूटिंग झाशी येथील कॉन्टेन्मेंट भागामध्ये सुरू आहे. चित्रपटातील अॅक्शन सीन्सचे येथे शूटिंग केले जात आहे.
View this post on Instagram
दरम्यान, 1997 साली आलेल्या ‘बॉर्डर’ चित्रपटात सनी देओलचे प्रमुख भूमिका होता. आता तब्बल 28 वर्षांनी येणाऱ्या या चित्रपटाच्या सिक्वलमध्येही सनी देओल एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. चाहते देशभक्तीपर अॅक्शन चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 1999 च्या कारगिल युद्धावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग हे करत आहेत. चित्रपटात सनी देओल, वरुण धवनसोबतच अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ या कलाकारांचीही प्रमुख भूमिका असणार आहे. अद्याप इतर कलाकारांची नावं समोर आलेली नाहीत. ‘बॉर्डर 2’ चित्रपट 23 जानेवारी 2026 ला रिलीज होणार आहे.