Sunil Shetty | अभिनेता सुनील शेट्टीने बॉलिवूड इंडस्ट्रीत मोठे यश संपादन केले आहे. आजही त्यांचा फिटनेस पाहून सर्वजण चकित होतात. दरम्यान, सुनील शेट्टीच्या पावलावर पाऊल टाकत लेक अथिया शेट्टीने हिरो या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर आता चित्रपटाचे कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी मोठा खुलासा केला आहे. ‘हीरो’ चित्रपटादरम्यान सुनील शेट्टीने चित्रपटाच्या कास्टिंग दिग्दर्शकाला बंगला गिफ्ट दिला होता. ‘हिरो’ चित्रपटाचे कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी एका पॉडकास्टमध्ये हा खुलासा केला आहे. मुकेश म्हणाले की, “जेव्हा सुनील शेट्टीची मुलगी अथियाची हिरो चित्रपटासाठी निवड झाली तेव्हा सुनील शेट्टीने त्याला ऑफिससाठी बंगला गिफ्ट केला होता. जेव्हा मी कास्टिंग दिग्दर्शक म्हणून काम करत होतो. त्यावेळी सुरुवातीच्या काळात सुनील शेट्टीने मला मदत केली. त्यांचा आराम नगरला १६० नंबरचा बंगला होता. त्यांनी तो बंगला मला ऑफिससाठी दिले होते. त्यावेळी सुनील शेट्टी मला म्हणाले की, तू खूप लहान ऑफिसमध्ये काम करतो. माझा आराम नगरमधील बंगला तू ऑफिस म्हणून वापर. तू फक्त चांगलं काम कर. भाड्याविषयी आजिबात काळजी करु नको.तू माझ्या मुलीसाठी एवढं केलं, तर प्लीज हा बंगला वापर. त्यानंतर मी तिथे माझे काम सुरू केले, नवीन कार्यालय सुशोभित केले, नवीन लोगो तयार केला आणि कार्यालयाचे उद्घाटन केले.” Sunil Shetty| दरम्यान, अथियाने 2015 मध्ये निखिल अडवाणीच्या रोमँटिक ड्रामा हिरोमधून आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली सोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती ‘मुबारका’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. आता तिने क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्न केले आहे. अथियाचा भाऊ अहान शेट्टीनेही मिलन लुथरियाच्या २०२१ मध्ये आलेल्या रोमँटिक ॲक्शन चित्रपट ‘तडप’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. Sunil Shetty | हेही वाचा: अर्थसंकल्पानंतर सेन्सेक्स 80280 पर्यंत तर निफ्टी 24450 च्या खाली ; TATA च्या शेअर्सची उसळी