Sunil Gavaskar on AUS vs ENG 1st test : पर्थ कसोटी केवळ दोन दिवसांत संपली, ही खेळपट्टी कसोटी सामन्यासाठी आदर्श नव्हती. मात्र कोलकाता कसोटीच्या खेळपट्टीवरून टीका करणारे समिक्षक पर्थ कसोटीच्या खेळपट्टीबाबत गप्प का, असा सवाल विक्रमादीत्य सुनील गावस्कर यांनी केला आहे. कोलकाताच्या कसोटीत वापरली गेलेली खेळपट्टी कसोटी सामन्याला अनुसरुन नव्हती, अशी टीका टीकाकारांनी केली होती. गवत कीती ठेवायचे हे क्युरेटर ठामपणे सांगू शकतो – ही कसोटी तीन दिवसांत संपली मात्र, पर्थची खेळपट्टी तर यापेक्षा सुमार दर्जाची होती तरीही त्यावर टीका झाली नाही. हे दुटप्पी धोरण नव्हे का, असा सवालही त्यांनी केला. गावस्कर म्हणाले, पर्थच्या खेळपट्टीवर गवत राखले होते, ती पूर्णपणे गोलंदाजांना साथ देणारी होती. खेळपट्टी तयार करताना त्यावर गवत कीती ठेवायचे हे क्युरेटर ठामपणे सांगू शकतो. मात्र, ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने तसे केले नाही. केवळ ट्रॅव्हिस हेडच्या अफलातून खेळीमुळे ऑस्ट्रेलिया जिंकली. मात्र, तरीही मला असे वाटते की ही खेळपट्टी कसोटी सामन्यासाठी आदर्श नव्हती. आयसीसी वारंवार ऑस्ट्रेलिया व इंग्लंडला झुकते माप देत आहे – गावस्कर पुढे म्हणाले, कोलकाता कसोटी तीन दिवसांत संपल्यावर याच समिक्षकांनी गळा काढला. खेळपट्टीवर टीका केली मात्र, पर्थवर गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली असा वक्तव्य त्यांनी केले म्हणजेच आपले अपयश त्यांनी लपवले. ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडमध्ये अशा खेळपट्ट्या तयार केल्यावर त्यावर टीका होत नाही पण अशाच खेळपट्ट्या जेव्हा आशियाई देशात तयार केल्या जातात, तेव्हा त्यावर टीका होते. आयसीसी वारंवार ऑस्ट्रेलिया व इंग्लंडला झुकते माप देत आहे. यात बदल होणे गरजेचे आहे. हेही वाचा – Dharmendra Passes Away : ‘माझे १० किलो रक्त कमी झाले…’, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट माजी खेळाडू पुढे म्हणाले की, कोलकाता कसोटीत फिरकी गोलंदाजांनाही मदत मिळत होती. केवळ फलंदाजी सुमार झाली त्यामुळे ही कसोटी तीन दिवसांत संपली. पर्थ कसोटीत तसे नव्हते. या खेळफट्टीवर केवळ वेगवान गोलंदाजांनाच मदत मिळत होती. फलंदाजांना चांगली खेळपट्टी मिळाली असती तर निकाल वेगळा लागला असता. पर्थची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी असते हे खरे असले तरीही त्यावर पाच दिवसांचा सामना संपूर्ण पाच दिवस चालेल अशीच खेळपट्टी मिळणे महत्वाचे आहे. मात्र, तसे घडले नाही. हेही वाचा – IND vs SA : यशस्वी जैस्वालचा मोठा पराक्रम! सचिननंतर २१ व्या शतकात ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय आयसीसीने दर्जा तपासावा – येत्या काळात कसोटी क्रिकेट टीकवायचे असेल तर प्रत्येक देशात तयार केल्या जात असलेल्या खेळपट्ट्यांचा दर्जा आयसीसीने तपासला पाहीजे. जर एखाद्या खेळपट्टीबाबत आयसीसी समाधानी नसेल तर त्यावर काही काळ कसोटी सामने आयोजित केले जाऊ नयेत. मात्र, हे केवळ आशियाई देशांपुरते मर्यादीत राहू नये, असेही गावस्कर म्हणाले.