Sunetra Pawar : बारामतीच्या राजकीय वातावरणात (Sunetra Pawar) नेहमीच चर्चेचा विषय राहिलेल्या बसप नेते काळुराम चौधरी आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जोडीने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. विकासाच्या मुद्द्यांवर अनेकदा अजित पवारांना धारेवर धरून टीका करणारे काळुराम चौधरी यांनी आता अजित पवारांच्या निधनानंतरच्या घडामोडींवर स्फोटक विधान केले आहे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड झाल्यानंतर, त्यांनी ३१ जानेवारी २०२६ रोजी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला घाईघाईत पार पाडण्यात आल्याची चर्चा सुरू असतानाच, बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव काळुराम चौधरी यांनी एक गंभीर आरोप केला आहे. जर हा शपथविधी तत्काळ झाला नसता, तर सुनेत्रा पवार यांच्यासह त्यांच्या दोन मुलांना – पार्थ पवार आणि जय पवार – वाळीत टाकण्यात आले असते, असा थेट दावा चौधरी यांनी केला आहे. काळुराम चौधरी यांनी या विधानाद्वारे बारामतीच्या राजकीय पटलावर नवीन वादळ निर्माण केले आहे. Sunetra Pawar ते म्हणाले की, अजित पवारांच्या निधनानंतरच्या परिस्थितीत राजकीय हालचाली वेगवान झाल्या होत्या. “तत्काळ शपथ घेण्याची गरज होती. अन्यथा मायलेकरांना वाळीत टाकलं असतं,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. याबाबत अधिक खुलासा करताना चौधरी म्हणाले, “त्यांच्या घरातील लोक कुठे चांगली होती. सावडलं तुम्ही सोनगावला आणि एक तासानंतर साहेब (शरद पवार) नीरा नदीवर कशाला गेले? तुम्ही इथलेच आहे की, तुम्हीच म्हणता ना माझी बारामती आहे. नीरेचे प्रदूषण पवारांसाहेबांना आता समजलं का? तिकडून राजकारण, तशा हालचाली सुरू झाल्या होत्या.” या विधानातून त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे (राशप) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. चौधरी यांच्या मते, या हालचालींमुळे सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला वेग आला आणि त्यामुळे कुटुंबाला वेगळे पाडण्याचा धोका टळला. काळुराम चौधरी यांनी अजित पवारांसोबतच्या त्यांच्या पूर्वीच्या संघर्षाचा उल्लेख करत सांगितले की, त्यांचा विरोध हा राजकीय आणि वैचारिक मुद्द्यांवर आधारित होता. “राजकीय आणि वैचारिक मुद्यावर माझा अजित पवारांना विरोध होता. ज्यावेळी अजितदादा विधानसभेत स्वराज्यरक्षक संभाजी महाराज असे म्हणाले होते, त्यावेळेस मी मोर्चा काढून त्यांचे समर्थन केले होते,” असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले, “अजितदादांबरोबर जी मलिदा गँग आहे, ती मलिदा गँग चुकीची कामं करायची, मग मला मुद्दा मिळायचा. त्यांनी चुकीचं केलं नसतं तर माझा आणि दादांचा संघर्ष झाला नसता.” या विधानातून चौधरी यांनी अजित पवारांच्या सभोवतालच्या लोकांना ‘मलिदा गँग’ म्हणून संबोधित करत त्यांच्या चुकीच्या कामांमुळे संघर्ष निर्माण झाल्याचे सांगितले. मात्र, अजित पवारांच्या चुकीच्या निर्णयांमुळे विकासाच्या मुद्द्यांवर ते नेहमीच टीका करत आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या स्फोटक विधानात चौधरी यांनी शरद पवारांवरही गंभीर आरोप केले आहेत. “शब्दाचा पक्का होता तो माणूस राहिला नाही, पवारसाहेब शब्दाचे पक्के नाहीत. त्यांच्या बोलण्यात काहीतरी राजकारण असतं,” असे म्हणत त्यांनी शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, “बाळकडू घरातच मिळालेल्या वहिनींनी बरोबर वेळेत जाऊन जे केले ते चांगले केले, अन्यथा वहिनी (सुनेत्रा पवार) आणि दोन मुलांना वेगळं पाडलं असतं,” असे सांगून सुनेत्रा पवारांच्या निर्णयाचे कौतुक करतानाच कुटुंबातील राजकीय दबावाचा उल्लेख केला आहे. बारामतीच्या राजकारणात अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निर्माण झालेल्या शून्यतेत सुनेत्रा पवारांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड आणि त्यानंतर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ ही घडामोडी वेगवान झाल्या आहेत. मात्र, काळुराम चौधरी यांच्या या विधानामुळे बारामतीच्या राजकीय पटलावर नवीन चर्चा सुरू झाली आहे. या आरोपांमुळे राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये (अजित पवार गट आणि शरद पवार गट) आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. हे पण वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा