Sunetra Pawar : बारामती पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार रिंगणात उभ्या आहेत. या पोटनिवडणुकीच्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. अंतिम मुदतीच्या अवघ्या एका तास आधी काँग्रेसने निवडणुकीतून माघार घेतली. मात्र, या निर्णयानंतरही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले असून एकूण 23 उमेदवार आता रिंगणात आहेत. यानंतर आता बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या महायुतीच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला आहे. कन्हेरी येथील मारुती मंदिरात दर्शन आज 12 एप्रिल 2026 रोजी सकाळी १० वाजता सर्वात आधी सुनेत्रा पवार आणि जय पवार यांनी विद्या प्रतिष्ठान येथे अजित पवार यांच्या स्मृतींना वंदन केलं. त्यानंतर बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील मारुती मंदिरात दर्शन घेऊन सुनेत्रा पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली. या प्रचार शुभारंभाच्या नारळ वाढवल्यानंतर आयोजित जाहीर सभेच्या माध्यमातून सुनेत्रा पवार मतदारांशी संवाद साधणार आहेत. या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री अदिती तटकरे, आमदार सरोज अहिरे, आमदार सना मलिक, आमदार शंकर मांडेकर आणि आमदार सुनिल शेळके यांच्यासह महायुतीचे अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. Sunetra Pawar हेही वाचा : Rohini Khadse : E-KYC साठी महिलांकडे शरीरसुखाची मागणी? रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप