Sunil Tatkare : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने पडद्यामागे राजकारण सुरू आहे. दोन दिवसांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आल्याने राजकीय हालचाली वेगाने घडत आहेत. राजकीय पक्षांनी बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आले होते. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेसने अद्यापर्यंत आपली भूमिका स्पष्ट केली नसून उमेदवार देण्यावर ठाम असल्याचे सांगितले जात आहे. सोमवार 6 एप्रिलला सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्या विरोधात 19 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनेत्रा पवार यांची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सर्वच प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या पक्षाने उमेदवारी देणार नाही, हे आधीच घोषित केले असल्याबद्दल सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे त्यांनी आभार मानले आहेत. काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्याने तेही उमेदवार देणार नाहीत, असे यावेळी बोलताना सुनील तटकरेंनी जाहीर केले आहे. याशिवाय, काँग्रेसशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु असून, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी आज बोलणे होईल आणि त्यांना देखील निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती केली करणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. त्यामुळे आघाडीतील दोन पक्षांनी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमदवार देणार नसल्याचे भूमिका घेतली असली तरी काँग्रेसची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे काँग्रेस बारामतीची लढणार की माघार घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. हेही वाचा : Priyanka Chopra On Raghav Chadha : राघव चढ्ढा यांना प्रियंका चोप्राचा पाठिंबा…