– गणेश काळे सध्या बच्चे कंपनी आणि तरुणपिढीवर गारूड असलेल्या व्हिडिओ गेमिंगमध्येही आता एआयचा वापर होऊ लागला आहे. आजवर व्हिडिओ गेम्सची रचना आणि निर्मिती मानवाकडूनच केली जात आहे. मात्र, आता या क्षेत्रात आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर येत्या काही वर्षांत दहा पटीने वाढण्याची शक्यता आहे. गेमिंगच्या निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, “आर्टिफिशियल इंटिलिजन्स’मुळे गेमिंगचे विश्व बदलून जाईल आणि गेमिंगमधील पात्रे अधिक सजीव वाटू लागतील. मॅनेजमेंट सल्लागार कंपनी “बाइन अँड कंपनी’ने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासानुसार, येत्या पाच ते दहा वर्षांत गेमिंगच्या विकास प्रक्रियेतील निम्मा वाटा आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा राहणार असल्याचे या क्षेत्रातील सक्रिय असलेल्या एक्झिक्यूटिव्हना वाटते. स्वप्नवत् क्षण साकारणारे एआय उदाहरणादाखल साशा मॅककिननच्या स्टुडिओत तयार केलेल्या “रोल प्लेईंग गेम डायमेशन्स’मध्ये एआयला एका वैशिष्ट्यपूर्ण पात्रात सामील करण्यात आले आहे. तो चमत्कारिक, पण चांगला माणूस आहे. त्याच्या अंगी कल्पकता नसानसात भिनली आहे. तो नेहमीच सेवेसाठी दुसऱ्याच्या टेबलवर हजर असतो आणि एकानंतर एक गमतीशीर सल्ले देत असतो. प्रसंगी हे पात्र असे काही बोलून जातात की त्याची कल्पनादेखील आपण करू शकत नाही. विशेष म्हणजे हे संवाद पटकथेतला भागही नसतो. याशिवाय खेळण्याच्या शैलीवर, पद्धतीवर गेमचे स्वरूप अवलंबून असते. गेम डेव्हलपिंगमध्ये एआयची एंट्री झाल्याने घाबरण्याची गरज नाही. यासंदर्भात डेव्हलपर साशा मॅककिनन म्हणतात, गेम डेव्हलपर्सना नोकरीची, रोजगाराची चिंता करण्याची गरज नाही. अर्थात, एआय हे त्यांचे स्थान घेऊ शकत नाही. साशा म्हणतात, गेम्स म्हणजे मानवाच्या अभिव्यक्तीचे शुद्ध रूप आहे. कारण त्यात नुसते कथानकच नसते तर कला, स्वर असतो आणि लोकांना अनुभव देण्याचे कामही करतो. पण या गोष्टी एआयकडून होणार नाहीत. डॅनियल लॅंडस मात्र या आशावादाला मानत नाहीत. ते फ्रीलान्स भाषांतरकार म्हणून काम करतात आणि “होगवार्टस लिगेसी अँड ओव्हरवॉच-2′ सारखा आंतरराष्ट्रीय गेम जर्मन भाषेतून मुलांसमोर आणतात. निर्मात्यांना व्हिडिओ गेम तयार करण्यासाठी एआयची गरज का भासत आहे. लॅंड्स म्हणतात, मशीनला संदर्भ कळत नाहीत, उलट मशीन भविष्यातील शक्यतांची पडताळणी करते. विशेषत: याठिकाणी एखादा क्लिष्ट प्रश्न किंवा रंजक मजकुराचा जसाच्या तसा अनुवाद करण्याची गोष्ट नाही तर मुद्दा मूळ विषयाचा गाभा पकडण्याचा आहे. एआय ही बाब करू शकत नाही. जोपर्यंत डेटा चांगला, तोपर्यंत एआय चांगला आहे. याशिवाय एआयमध्ये काळानुसार किती सुधारणा होईल, हे निश्चित झाले नाही. कदाचित त्याचा दर्जा खराबही राहू शकतो. अभ्यासक चॅटजिपीटीचे उदाहरण देत आहेत. एआयचा वापर काळानुसार वाढत राहिला तर गेम्सच्या दर्जावर नक्कीच विपरीत परिणाम होईल आणि हे सांगण्याची गरज नाही. पण तंत्रज्ञान, मानवी भाषांतरकार, गेम डेव्हलपर्स किंवा लेखकांची अपेक्षा नेहमीच अधिक असते. विशेष म्हणजे स्वस्त असेल तर ती टिकूनही राहील आणि अशा स्थितीत लोकांच्या नोकरीवर गदा आणू शकते. गेम डेव्हलपर मॅककिनन म्हणतात, एआय हा सर्वात मोठ्या जोखमीपैकी एक आहे आणि ती जोखीम म्हणजे लोक निष्काळजी होतात. ही बाब एआयशी संबंधित सर्वात मोठ्या गोष्टींपैकी एक आहे. आपण सध्या उंबरठ्यावर उभे आहोत. आपल्याला दोन्ही गोष्टी ठाऊक आहेत. एक तर हे चांगले परिणाम हाती देऊ शकतात किंवा मानवतेला हानिकारक ठरू शकतात. आपण एआयवर डोळे झाकून विसंबून राहू नये. याउलट त्याचा वापर एखाद्या टूलप्रमाणे करायला हवा. जसे की प्रेरणा मिळण्यासाठी, कथानक आणि गेम्स तयार करण्यासाठी एआयएने प्रोत्साहन देणे. एखादी व्यक्ती गेमही तयार करू शकणार नाही; परंतु यानिमित्ताने नवीन लोक अणि नवीन खेळ येतील, अशीही अपेक्षा करतात. या तंत्रज्ञानाच्या आधारे त्यांच्यात विकास होण्यास मदत मिळेल. प्रत्यक्षात अलीकडच्या काळात यशस्वी गेम्स तयार झाले आहेत. कारण, सध्याच्या गेम्सचे नूतनीकरण केले असून एक कम्युनिटी त्याला पुढे नेत आहे. म्हणजेच खेळणाऱ्या मंडळींनीच या खेळाला पुढे नेले, गेम उद्योगाने नाही. अन्य खेळाचा विचार केला तर काउंटर स्ट्राइक गेम, शूटर गेम, हाफ लाइफ या रुपातून नवीन गेम तयार झाले. फोर्टनाइट, प्लेअरअननोन्स, बॅटलग्राउंड हे व्हेरियंट असून त्याची संकल्पना पाहिली तर यातील शंभर खेळाडू एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतात. शेवटी यात जो वाचतो, तोच जिंकतो. त्याची रचना “मॉडर’ने केली होती. जी मंडळी नवीन पातळी आणि मॅप तयार करून गेम्सला पुन्हा एकदा नवे रूप देण्याचे काम करतात, अशा लोकांसाठी हा शब्द वापरला जातो. एआयमुळे गेम तयार करणे सोपे भविष्यातील एक संकल्पनेच्या आधारावर गेम तयार करण्याच्या क्षेत्रात एआयचा वापर केल्याने आणखी नावीन्यपूर्ण गेम्स तयार होतील. अर्थात, त्याला दर्जा असेलच असे नाही. याचा अर्थ गेम हा कंटाळवाणा राहू शकतो आणि किरकोळ गेमची संख्या वाढेल. स्टीम गेमिंग प्लॅटफार्मवर सरासरी दररोज तीसपेक्षा अधिक नवीन गेम्सचा समावेश होत आहे. याशिवाय गेमचे ग्राफिक्स, कॉपीरायटिंग ते प्रोग्रॅमिंगपर्यंत अनेक जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या “एआय’च्या आधारावर प्रत्येकाला गेम तयार करणे सोपे होईल. याचाच अर्थ आगामी वर्षांत अधिक यूजर जनरेटेड कन्टेट समोर येऊ शकतात आणि ते देखील नवीन चांगल्या खेळाची रचना करू शकतात. प्रारंभीच्या काळात मर्यादित प्रमाणात दिसणारे तंत्रज्ञान विकास हे कालांतराने व्हिडिओ गेम्सच्या रचनेत महत्त्वाचा वाटा उचलतील. 1980 च्या दशकात टेक्स्ट ऍडव्हेंचर्सची सुरुवात झाली आणि नंतर 1990च्या दशकात पिक्सल ग्राफिक्ससह टू डी प्लॅटफॉर्म आले आणि 2000च्या दशकात व्यापक प्रमाणातील ओपन वर्ल्ड गेम्सची ओळख जगाला झाली. आज लोकप्रिय असणारे मल्टीप्लेअर ऑनलाइन गेम्सचा प्रभाव सर्वत्र दिसून येतो.