Sundara Manamadhe Bharli : ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील अभिनेत्री झळकणार हिंदी मालिकेत
Sundara Manamadhe Bharli : अक्षया नाईकने ‘कलर्स मराठी’च्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती.
Sundara Manamadhe Bharli : अनेक मराठी कलाकार मंडळींनी हिंदी प्रोजेक्ट्समध्ये देखील उत्तमरित्या काम केले आहे. यातच आता मराठी मालिका विश्वातील ‘सुंदरा’ म्हणून ओळख मिळालेली अभिनेत्री अक्षया नाईक देखील नवी सुरुवात करणार आहे.
अक्षया नाईकने आजवर मराठी नाटक, मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अक्षयाने ‘कलर्स मराठी’च्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. आता पुन्हा एकदा अक्षया हिंदी मालिकेत झळकणार आहे.
खरंतर, अक्षयाचा प्रवास हिंदी टेलिव्हिजन विश्वातून सुरू झालेला आहे. आता पुन्हा एकदा ती छोट्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे.
View this post on Instagram
‘अँड टीव्ही’वर प्रसारित होणाऱ्या ‘हे भगवान कितना बदल गया इंसान’ या मालिकेत अक्षया महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या आगामी मालिकेत ती कोणती भूमिका साकारणार हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. Sundara Manamadhe Bharli :
अलीकडेच अक्षया अमृता खानविलकरची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या ‘तस्करी’ या हिंदी सीरिजमध्ये पाहायला मिळाली होती. Sundara Manamadhe Bharli
हेही वाचा:
Kiara Advani Post : सिद्धार्थच्या वडिलांचे निधन; भावूक झाली कियारा, ते पोस्ट शेअर करत म्हणाली…





