“सुना है पुराने दोस्तोने…”; वांद्रे पूर्वमधून ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर; झिशान सिद्दिकींची खोचक पोस्ट

Zeeshan Siddique vs Uddhav Thackeray | विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून आपल्या उमेदवारांची नावे जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाने त्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ज्यात 65 उमेदवारांचा समावेश आहे.
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून सरदेसाई यांना उमेदवारी दिली आहे. वरुण सरदेसाई यांच्यासमोर विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी यांचे आव्हान असणार आहे. ठाकरे गटाकडून वरुण देसाई यांना उमेदवारी जाहीर करताच झिशान सिद्दीकी यांनी एक खोचक पोस्ट शेअर केली आहे.
झिशान सिद्दिकी काय म्हणाले?
झिशान सिद्दिकी यांनी पोस्टमध्ये म्हटले की “जुन्या मित्रांनी (उद्धव ठाकरे) वांद्रे पूर्व मतदारसंघात त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे. यांनी कधीच कोणाची साथ दिली नाही. जो आदर आणि सन्मान देईल त्याच्याबरोबरची नाती सांभाळा, आपापल्या फायद्यांसाठी जमलेल्या गर्दीचा काहीच फायदा नसतो. आता जनता निर्णय घेईल!” Zeeshan Siddique vs Uddhav Thackeray |
सुना है पुराने दोस्तों ने वांद्रे पुर्व में अपना उम्मीदवार घोषित कर दिया है । साथ निभाना तो कभी इनकी फितरत में था ही नहीं।
“रिश्ता उसी से रखो जो इज़्ज़त और सम्मान दे,
मतलब की भीड़ बढ़ाने का कोई फ़ायदा नहीं।”अब फैसला जनता लेगी!!!!
— Zeeshan Siddique (@zeeshan_iyc) October 23, 2024
दरम्यान, वांद्रे पूर्व हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघावर सुरुवातीपासून शिवसेनेची पकड आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान याच मतदारसंघात आहे. 2019 च्या निवडणुकीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात गेला. काँग्रेसचे झिशान सिद्दिकी येथील विद्यमान आमदार आहेत. Zeeshan Siddique vs Uddhav Thackeray |
दरम्यान, झीशान सिद्दीकी यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातूनच निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आतापर्यंत 38 उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, त्यांनी अद्याप वांद्रे पूर्व जागेसाठी उमेदवार दिलेला नाही.




