Summer Health: दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश अस्थमा या गंभीर श्वसनविकाराबाबत जागरूकता वाढवणे आणि रुग्णांना योग्य काळजी घेण्यास प्रोत्साहित करणे हा आहे. अस्थमा हा श्वसनमार्गात सूज येण्यामुळे होणारा आजार आहे. यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि काही वेळा हा त्रास जीवघेणाही ठरू शकतो. साधारणपणे धूळ, धूर, प्रदूषण आणि थंडीच्या दिवसांमध्ये अस्थमा अटॅकचा धोका वाढतो. मात्र, अनेकांना वाटतं की उन्हाळ्यात हा धोका कमी असतो. पण तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यातही अस्थमा रुग्णांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. Summer Health श्वसनरोग तज्ज्ञ यांच्या मते, थंडीप्रमाणेच उष्ण हवामानही अस्थमा रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकतं. वाढत्या तापमानाचा थेट परिणाम श्वसनसंस्थेवर होतो. उन्हाळ्यात हवेत ओझोन आणि इतर प्रदूषकांचे प्रमाण वाढते, ज्यामुळे श्वसनमार्ग अरुंद होऊ शकतात आणि श्वास घेणं कठीण होतं. (Summer Health) तसेच, उष्णतेमुळे डिहायड्रेशन, इलेक्ट्रोलाइट्सचा असंतुलन आणि थकवा वाढतो. याचा परिणाम फुफ्फुसांवर होऊन श्वास घेण्याचा त्रास अधिक वाढू शकतो. काही अभ्यासांनुसार, उष्णतेच्या लाटांदरम्यान अस्थमा संबंधित आपत्कालीन रुग्णांमध्ये १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. Summer Health: उन्हाळ्यातही अस्थमा अटॅकचा धोका; तज्ज्ञांचा इशारा आणि महत्त्वाच्या उपाययोजना उन्हाळ्यातील वाढते तापमान आणि प्रदूषण हे अस्थमा अटॅकचे महत्त्वाचे ट्रिगर ठरू शकतात. त्यामुळे या दिवसांमध्ये विशेष काळजी घेणं अत्यावश्यक आहे. तज्ज्ञांनी काही महत्त्वाच्या उपाययोजना सुचवल्या आहेत. सर्वप्रथम, ज्यामुळे अस्थमा वाढतो अशा गोष्टींपासून दूर राहणं गरजेचं आहे. घरातील स्वच्छता राखणे, एसी आणि कूलरचे फिल्टर नियमित साफ करणे आवश्यक आहे. यामुळे धूळ आणि जंतूंचा प्रभाव कमी होतो. याशिवाय, पुरेसं पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे. शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य राहिल्यास श्वसनमार्गातील म्यूकस पातळ राहतो आणि श्वास घेणं सोपं होतं. डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित औषधं आणि इनहेलरचा वापर करणंही गरजेचं आहे. (Summer Health) जर बाहेर जाणं आवश्यक असेल, तर मास्क वापरणं फायद्याचं ठरतं. यामुळे धूळ, प्रदूषण आणि अॅलर्जन्सपासून संरक्षण मिळतं. एकूणच, अस्थमा हा केवळ हिवाळ्यातच नव्हे तर उन्हाळ्यातही गंभीर होऊ शकतो. त्यामुळे हवामान बदलत असताना रुग्णांनी अधिक सजग राहून योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. (Summer Health)