नवी दिल्ली – हाय-प्रोफाइल लोकांना 200 कोटींपेक्षा जास्त रक्कमेचा गंडा घालणारा आणि बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्रींना कोट्यवधी रूपयांचे गिफ्ट देऊन प्रकाशझोतात आलेला सुकेश चंद्रशेखर याने सध्या सर्वांचीच झोप उडवली आहे. सध्या सुकेश चंद्रशेखकर याला दिल्लीच्या मंडोली कारागृहात ठेवण्यात आलं आहे.
दरम्यान, आता त्यानं थेट तुरूंगातून एक चिट्ठी लिहत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सरकारवर कमीशन घेतल्याचा गंभीर आरोप केला आहेत. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.
आपल्या चिट्ठीत सुकेशनं लिहलं की… “तुम्ही मला ठग म्हणता पण सगळ्यात मोठे घोटाळेबाज तर तुम्हीच आहात. वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांनी एक हजार कोटी रुपयांचे कमीशन घेतलं आहे. इतकेच नव्हे तर, अरविंद केजरीवाल,
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी गरीब मुलांच्या शिक्षणातही मोठा घोटाळा केला असल्याचं सुद्धा सांगितलं आहे. मुलांच्या शिक्षणात स्टेशनरीमध्ये घोटाळा केल्या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा… असं देखील यामध्ये म्हंटलं आहे.
मुलांना शाळेत जे टॅबलेट वाटायचे होते त्यासाठी आधी मसुदा तयार केला होता. ते टॅबलेट माझ्या माध्यमातून एका चायनीज कंपनीकडून खरेदी केले जाणा होते. मात्र दुसऱ्या कंपनीने 20 टक्के कमीशन देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर केजरीवाल सरकारने टेंडर माझ्याऐवजी अन्य दुसऱ्याला देण्याचा निर्णय घेतला. असे अनेक आरोप सुकेशने आपल्या चिट्ठीतून केले आहेत.