अहमदनगर – एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना अहमदनगर जिल्ह्यात केडगावमध्ये घडली आहे. कर्ज बाजाराला कंटाळून यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
आत्महत्या करणाऱ्यामध्ये पती, पत्नी आणि मुलाचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलिसांना सुसाईट नोट मिळाली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.