पिंपरी | आकुर्डीत विवाहितेची आत्महत्या

पिंपरी, (प्रतिनिधी) – राहत्या घरात स्कार्पच्या सहायाने गळफास घेऊन विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. ११) सायंकाळी दत्तवाडी, आकुर्डी येथे घडली.
अंकिता सौरभ राणे (वय ३४, रा. दत्तवाडी, आकुर्डी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. अंकिता यांचे सासू सासरे हे पुण्याला गेले होते.
त्यावेळी अंकिता व सौरभ हे दोघेजण घरी होते. सौरभ हे फोनवर बोलत असताना अंकिता यांनी बेडरूमध्ये जाऊन छताच्या पंख्याला स्कार्पच्या सहायाने गळफास घेतला.
ही बाब सौरभ यांच्या लक्षात येताच त्यांनी दरवाजा तोडून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या अंकिता यांना जवळच्या दोन खासगी रुग्णालयात नेले.
मात्र त्यांनी दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर अंकिता यांना पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.





