फरीदाबाद: येथील पोलिस उपायुक्त विक्रम कपुर यांनी रिव्हॉल्वर मधून स्व:तावर गोळी झाडून आत्महत्या केली असल्याचे उघड झाले आहे. आज सकाळी सहा वाजता त्यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वर मधून डोक्यात गोळी झाडून घेतली. ते सेक्टर 30 मध्ये पोलिस वसाहतीत राहात होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
आत्महत्येपुर्वी त्यांनी आपल्या घरात कोणती चिठ्ठीही लिहून ठेवलेली नाही. त्यामुळे त्यांच्या आत्महत्या प्रकरणा मागचे कारण समजण्यात अडचण होत असून पोलिस त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी करीत आहेत. आयपीएस अधिकारी असलेल्या कपुर यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे पोलिस दलात मात्र खळबळ माजली आहे. हरियाना पोलिस दलातील ते एक अनुभवी आणि वरीष्ठ अधिकारी होते. कौटुंबिक वादातून त्यांनी हा प्रकार केला असावा असा कयास आहे.