पुणेः पुण्यात एकाच कुटूंबातील चाैघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये दोन चिमूरड्यांचा देखील समावेश आहे. अतुल दत्ता शिंदे (वय 33 ),जया अतुल शिंदे (वय 32),ऋग्वेद अतुल शिंदे (वय 6) अंतरा अतुल शिंदे (वय 3, राहणार सर्वजन सुखसागर नगर गल्ली नं 1 अहिरन्त सर्वे नं 15/1) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. ही घटना गुरूवारी रात्री अकराच्या सुमारास सुखसागरनगर परिसरात उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, एक दिवस घराचा दरवाजा न उघडल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, हा धक्कादायक प्रकार समोर आला. फॅनच्या अॅंगलला नायलाॅनच्या दोरीने चाैघांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. अतुल शिंदे हे शाळेतील मुलांचे आयडेंटीकार्ड तयार करण्याचा व्यावसाय करतात. तसेच त्यांचा प्रेम विवाह असून, घरच्या सोबत काही मतभेद देखील असल्याचे समजते.
दरम्यान, पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेऊन शवविछेदनासाठी ससुन रुग्णलयात पाठविले. आत्महत्या करण्याचे ठोस कारण अद्याप पुढे आलेले नाही. मात्र आर्थिक विवंचनेतुन ही आत्महत्या घडली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अतुल शिंदे विविध प्रकारचे ओळखपत्र छपाई करण्याचे काम करीत होते. मात्र लॉकडाऊनमध्ये शाळा, महाविद्यालये बंद असल्याने व व्यावसाय बंद असल्यामुळे आर्थिक विवंचना निर्माण झाली, त्यातुनच शिंदे कुटुंबाने आत्महत्या केली, अशी चर्चा सुरु आहे.