लाल साडीतील सुहाना खानचा देसी लुक

Suhana Khan Photos| अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. याशिवाय तिने बॉलीवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे. सोशल मीडियावर देखील सुहाना सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातील तिच्या देसी लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सुहाना खानने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने लाल रंगाच्या साडीवर खास फोटोशूट केले आहे. यासोबतच तिने खास ज्वेलरी देखील कॅरी केली आहे. सध्या तिचा हा लुक अनेकांच्या पसंतीस पडला असून यावर लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
सुहाना खानने ‘द आर्चिज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. मात्र याआधीही तिचे सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोअर होते. इंस्टाग्रामवर सुहानाचे 5 मिलियनहून अधिक लोक फॉलोअर्स आहेत. Suhana Khan Photos|
दरम्यान, शाहरुख लवकरच एका चित्रपटात त्याची लेक सुहाना खानसोबत काम करणार आहे. ‘किंग’ या चित्रपटात शाहरुख आणि सुहाना एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. Suhana Khan Photos|





