पुणे – जून आणि जुलै काळात पाऊस कमी झाला. त्यानंतरच्या टप्प्यात मोठा पाऊस झाला. पण, परतीचा पाऊस म्हणावा तसा झाला नाही. ऑगस्ट ते ऑक्टोबर काळात वातावरण सतत ढगाळ होते. या सर्वांचा परिणाम ऊस उत्पादनावर झाला आहे. आवश्यक सूर्यप्रकाश न मिळाल्याने उसाचे वजन आणि प्रतही ढासळली. यामुळे यंदा साखरेचे उत्पादनही घटण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्यात हवामानातील बदलामुळे ऊस उत्पादनात हेक्टरी 20 ते 30 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. मान्सून अखेरच्या काळात सतत पाऊस आणि खोडवा उसाचे प्रमाण अधिक असल्याने उसाचे हेक्टरी उत्पादन 105 टनांवरून घटून 85 टनांपेक्षा खाली आले आहे. त्यामुळे आता 138 लाख टनांऐवजी 116 ते 120 लाख टन साखर उत्पादन हाती येण्याचा अंदाज आहे. तर इथेनॉलकडे साखर वळविण्यामुळे 16 लाख टन साखर उत्पादन कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. देशात 260 लाख टन उत्पादन देशात फेब्रुवारीअखेर 260 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर, आतापर्यंत 463 पैकी 61 कारखान्यांनी आपला गाळप हंगाम पूर्ण केला आहे. मार्चअखेर देशातील निम्म्यापेक्षा अधिक कारखाने आपला गाळप हंगाम पूर्ण करतील, असा अंदाज या क्षेत्रातील अभ्यासक वर्तवत आहेत. 45 लाख टन साखर वळवली साखर उत्पादनासोबत काही कारखाने इथेनॉल उत्पादनही घेत आहेत. त्यासाठी देशभरातून तब्बल 45 लाख टन साखर वळवण्यात आली आहे. त्यामुळे एकूण साखर उत्पादनच घटणार आहे. त्याचा परिणाम काही अंशी खुल्या बाजारात साखरेच्या भावावर होऊ शकतो. पुढील वर्षी “सुगी’ यंदा तब्बल 55 टक्के ऊस उत्पादन हे खोडव्यावर आधारित होते. पुढील हंगामात खोडवा उसाचे प्रमाण कमी राहू शकते. त्यामुळे उत्पादन वाढण्याची आशा आहे. अर्थात त्यासाठी पोषक हवामान असेल, तर साखर उतारा आणि उत्पादन वाढू शकते. राज्यातील साखर कारखान्यांची संख्या 173 : सहकारी तत्वावर 23 : खासगी तत्वावर गाळप वाढले, पण साखर घटली… 2,653 लाख टन मागील वर्षीचे गाळप 2,755 लाख टन यंदाचे गाळप 334 लाख टन यंदाचे साखर उत्पादन 359 लाख टन मागील वर्षीचे साखर उत्पादन