पिंपरी | चिखलीत ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ चा प्रत्यय

जाधववाडी, (वार्ताहर) – चिखली येथील ज्ञानाई शिक्षण संस्थेचे कै. जगन्नाथ तुकाराम राऊत प्राथमिक विद्यालय व ज्ञानज्योती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आषाढीवारीनिमित्त पालखी सोहळा आयोजित केला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध संतांचे अभंग व ज्ञानोबा तुकाराम चा जयघोष करत टाळ मृदंगाच्या नादावर ठेका धरला होता हे सर्व दृश्य म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग! आनंदाचे अंग आनंदी ही याचा प्रत्यय येत होता.
यावेळी संस्थेच्या सचिव शकुंतला राऊत व संस्थेचे अध्यक्ष राहुल राऊत सदस्य सोमनाथ राऊत कांचन राऊत उपस्थित होते. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कोमल राऊत, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वर्षा लोखंडे, प्रभारी मुख्याध्यापक अभिजीत राऊत, अश्विनी राऊत आदी उपस्थित होते.
शालेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा साकारली होती.टाळ मृदंगाच्या ठेक्यावर शाळेतील विद्यार्थ्यांनी नामघोष व फुगडी घातली. यावेळी भावेश व भार्गव खोसे या छोट्या बालवारकर्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अभंग वाणीच्या माध्यमातून वारीचे महत्व सांगितले. या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख पांडुरंग बोडके, जयश्री चक्कर यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





