Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवारांनी महाविकास आघाडीला लगावला मिश्किल टोला; म्हणाले…

नागपूर : विधानसभेच्या निवडणूका महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. येत्या १-२ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू शकते. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात हा सामना रंगणार आहे. आगामी विधानसभेसाठी भाजपची यादी जवळपास निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान राज्यात 150 ते 160 जागांवर भाजप लढण्याची शक्यता आहे. यावर भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?
आगामी निवडणुकीचे विश्लेषण आणि तयारीच्या अनुषंगाने बैठका होत राहतील. मात्र, महाविकास आघाडीने वाट लावण्याचे काम मध्यंतरी केलं. कारण सांगून नापास होणारे विद्यार्थी म्हणजे महाविकास आघाडी आहे असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.
माविआवर केली टीका
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण, यावर एक मत होत नाही, त्यांच्यात प्रचंड भांडण आहे. महायुतीने केल्यानंतर चाटायच काम महाविकास आघाडी करते का? असं कुठलं कारण देण्याचं काम महाविकास आघाडीचे नेते करत आहे. त्यातून सिद्ध होते की महायुती श्रेष्ठ आहे, जनतेने समजून घ्यावे, आमच्या निर्णयाशिवाय महाविकास आघाडी निर्णय घेऊ शकत नाही. असा घाणाघातही मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी मविआ वर केला आहे.





