Sudhakar Badgujar | आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इनकमिंग सुरू झाली आहे. स्थानिक पदाधिकऱ्यांचा विरोधानंतरही सुधाकर बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी मुंबई भाजपच्या प्रदेश कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी सुधाकर बडगुजर मंगळवारी सकाळी हजारो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. बडगुजर यांच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. आज दुपारी एक वाजता मुंबईतील भाजपच्या नरिमन पॉईंट येथील कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. गिरीश महाजन आणि भाजपचे सर्व वरिष्ठ नेते या वेळी उपस्थित राहणार आहेत. सुधाकर बडगुजर यांच्यासोबतच माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे. त्यासोबतच देवानंद बिरारी, अशोक सातभाई, कन्नू ताजणे, बबन घोलप, नयना घोलप, वंदना बिरारी, हर्षा बडगुजर यांचाही प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानामुळे बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. Sudhakar Badgujar | काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे ? चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही. आमच्याकडे बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक पदाधिकऱ्यांचा विरोध आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही. नाशिकचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा या पक्षप्रवेशाला विरोध आहे. निवडणुकीच्या राजकारणात जेव्हा आपण एकमेकांच्या विरोधात लढतो आणि आता निवडणुकीला फक्त सहा महिने झाले आहे. त्यामुळे विरोधाची भावना असते. परिणामी नाशिकमध्ये बडगुजर यांच्याविषयी विरोधाची भावना आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे आज सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश होणार की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या शक्तीप्रदर्शनाची तयारी करुन मुंबईला निघालेल्या सुधाकर बडगुजर यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होऊ शकला नाही तर त्यांच्यासाठी मोठी नामुष्की ठरेल. Sudhakar Badgujar | दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी या दिशेने तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीत सध्या इनकमिंग सुरू आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधून महायुतीमध्ये येणाऱ्यांचा ओघ वाढला आहे. आगामी मनपा निवडणूक जिंकण्यासाठी हे प्रवेश महत्त्वाचे मानले जात आहेत. Sudhakar Badgujar | हेही वाचा: Transport news : सायकल कॅरीअरला हिरवा कंदील ! वाहनांवर कारवाई न करण्याचे परिवहन आयुक्तांचे आदेश