नवी दिल्ली – भारतीय निवडणूक आयोगाकडून कर्नाटक विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करण्यात आली. विधानसभेच्या 224 जागांवर यावेळी निवडणूक होणार आहे. आज 10 मे रोजी मतदान होणार होत आहे तर 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
#WATCH | Jayanagar, Bengaluru | Sudha Murty gives a message to young voters after casting her vote; says, “Please look at us. We are oldies but we get up at 6 o’clock, come here and vote. Please learn from us. Voting is a sacred part of democracy…”#KarnatakaElections pic.twitter.com/B1ecZCH93M
— ANI (@ANI) May 10, 2023
अशात आज इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या-लेखिका सुधा मूर्ती यांनी मतदान केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलतांना देशातील शाश्वत बदलांबाबत आपल मत व्यक्त केलं. यादरम्यान सुधा मूर्ती यांनी नवमतदारांचे कान पिळले.
माध्यमांशी बोलतांना सुधा मूर्ती यांनी मतदानासाठी घराबाहेर न पडणाऱ्या नवमतदारांना त्या म्हणाल्या,“मी तरुणांना सांगेल की, कृपया आमच्याकडे पाहा. आम्ही म्हातारे आहोत. पण तरी आम्ही सकाळी ६ वाजता उठलो. तयार झालो आणि इथे येऊन मतदान केलं. कृपया आमच्याकडून शिका”, असा सल्ला त्यांनी तरुण मतदारांना दिला आहे.