१२ व्या वर्षी वडिलांचं छत्र हरपलं..एकवेळच्या जेवणाचे झाले हाल ; १० ते ५ ची नोकरी करत केला अभ्यास अन् पहिल्याच प्रयत्नात ‘ती’ बनली अधिकारी

Success Story of Ijya Tiwari । असे म्हणतात की जर हेतू मजबूत असतील आणि कठोर परिश्रम केले असतील तर यश मिळवणे कठीण नसते. हे कन्नौज जिल्ह्यातील ए.आर.टी.ओ. इज्या तिवारीने सिद्ध केले आहे. आयुष्यातील प्रत्येक परीक्षेला धैर्याने तोंड देऊन कठोर परिश्रमाने तिच्या आई आणि वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी एक मुलगी अगदी थोड्याशा अडचणीतही हार मानणाऱ्या सर्वांसाठी एक उदाहरण बनली आहे. खूप लहान वयातच नियतीने तिच्या वडिलांच छत्र हिरावलं. त्यामुळे तिच्या आईला धक्का बसला. पण तिने या संकट प्रसंगात न ढगमगाटा आपल्या प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवले. त्याच मेहनतीचा आणि जिद्दीचा संपूर्ण प्रवास आजच्या प्रेरणादायी कहाणीमधून जाणून घेऊ….
मूळ लखनौची रहिवासी असलेली इज्या तिवारी हिला जिल्ह्यात पहिल्यांदाच परिवहन विभागाच्या म्हणजेच एआरटीओच्या महिला अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्या १२ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यावेळी इज्या तिवारी आठवी इयत्तेत शिकत होती. सर्व बचत वडिलांच्या आजारावर खर्च झाली. एक वेळ अशी आली की माझे प्रियजनही मला सोडून गेले आणि मी माझे वडिलोपार्जित घरही गमावले. भाड्याच्या घरात राहावे लागले. वडील गेल्यानंतर आईची मानसिक स्थिती ठीक नव्हती. घरी जेवणासाठीही पैसे नव्हते. या परिस्थितीत रडत बसण्यापेक्षा लढणे जास्त योग्य असल्याचा विचार मनात पक्का करून ईज्या तिवारी लढण्यासाठी पुढे आल्या. त्यातूनच त्या त्यांच्या आईचा आधार बनल्या. इज्या तिवारी ही तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे.
पहिल्या प्रयत्नात यश Success Story of Ijya Tiwari ।
इज्या यांनी आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंगाचे वर्णन करतांना एका मुलाखतीत त्याच्या आयुष्याचे सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. वडील गेल्यानंतर सगळं बदललं आणि आम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. माझ्या स्वतःच्या अनेक लोकांनी मला सोडून दिले. पण मी हार मानली नाही. माझे गुरु, जे ब्राइट लाईन इंटर कॉलेजमध्ये शिक्षक होते, त्यांनी पैसे नसतानाही मला मोफत शिक्षण दिले. मला वाचन आणि लेखनाची आवड होती आणि मी अभ्यासातही चांगली होते. माझा संघर्ष १२ वर्षांचा झाल्यावर सुरू झाला. खूप कष्ट केल्यानंतर मला बँकेत नोकरी मिळाली. यानंतरही मी माझा अभ्यास सुरू ठेवला. बँकेतून परतल्यानंतर मी रात्री तासन् तास अभ्यास करायचे. सुमारे ४ वर्षे खूप मेहनत केली. त्यानंतर उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगात पहिल्याच प्रयत्नात मला यश मिळाले.” असे म्हटले.
स्वतः अभ्यास केला आणि आईलाही शिकवले
इज्या त्यांच्या कॉलेजच्या काळात ट्यूशन शिकवत असे. इज्या यांनी त्यांच्या आईलाही पुढे शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले. त्यांना पदवी मिळवायला लावली. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आई खूप दुःखी झाली होती, अनेक अडचणींना तोंड दिले आणि आईची त्यांनी काळजी घेतली. मुलगी होण्याऐवजी त्या त्यांच्या आईच्याच आई बनल्या आणि त्यांची सेवा करू लागल्या. २०१४ मध्ये बँकेत नोकरी मिळाल्यानंतरही, इज्या तिच्या आईची काळजी घेत होत्या. सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नोकरी. त्यानंतर रात्री ९ ते पहाटे २-३ वाजेपर्यंत कठोर आणि परिश्रमपूर्वक अभ्यास करून यूपीपीसीएसची तयारी करू लागली. इज्या यांनी तयारीदरम्यान कोणतीही शिकवणी लावली नव्हती. त्यांनी ऑनलाइन आणि इतर स्रोतांद्वारे त्यांचा अभ्यास सुरू ठेवला. २०१८ च्या बॅचमध्ये इज्या तिवारी यांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले.
परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संदेश Success Story of Ijya Tiwari ।
दरम्यान, इज्या तिवारी यांनी, उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागते. अभ्यास करताना त्यांनी वेळेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे; अभ्यास करताना मी स्वतःला थोडे वेगळे केले होते. अशा परिस्थितीत, आयुष्यातील चढ-उतारांमध्येही, मी माझा अभ्यास पूर्णपणे वेगळा ठेवला. कामासोबतच मी सतत ५ ते ६ तास परिश्रमपूर्वक अभ्यास केला. विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत निराश होऊ नये. जर तुम्ही पूर्ण समर्पण आणि मनापासून तयारी करत असाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल असे म्हटले. दरम्यान, कठीण प्रसंगात धैर्याने संकटाना सामोरे गेले तर यश आपोआप आपल्याकडे चालत येते हेच ईज्या तिवारी यांच्याकडे पाहून समजते,





