नगर -गांधी मैदान येथील पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या श्री मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन असून, कला शाखेचा निकाल 93.25 टक्के लागला आहे. विद्यालयाच्या गुणवत्ता यादीत प्रथम सुवर्णा मते (83.38 टक्के), द्वितीय- सोनाली बनकर (76.92 टक्के), तृतीय- पूजा उमाप (76.30 टक्के) येण्याचा बहुमान पटकाविला आहे. यशस्वी विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत छिंदम, ज्येष्ठ संचालक शरद क्यादर, सचिव बाळकृष्ण सिद्दम, माजी प्राचार्य रावसाहेब क्षेत्रे, विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक रामदिन, उपमुख्याध्यापक पांडूरंग गोने, पर्यवेक्षिका सरोजनी रच्चा यांनी अभिनंदन केले आहे.