फेडरल बॅंकेच्या नफ्यात भरीव वाढ
Updated On:

नवी दिल्ली – पहिल्या तिमाही मध्ये फेडरल बॅंकेचा नफा 64 टक्क्यांनी वाढून 600 कोटी रुपये इतका झाला आहे. बॅंकेने शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, गेल्या वर्षी पहिल्या तिमाहित बॅंकेला केवळ 367 कोटी रुपयांच्या नफ्यावर समाधान मानावे लागले होते.
पहिल्याचे तिमाहित बॅंकेची उलाढाल वाढून 4,081 कोटी रुपये इतकी झाली आहे. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहित बॅंकेची उलाढाल 4003 कोटी रुपये इतकी होती. बॅंकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता कमी होऊन 2.69% इतकी झाली आहे. जी की गेल्या वर्षी 3.50% इतकी होती. कर्ज वसुली वाढल्यामुळे बॅंकेची निव्वळ अनुत्पादक मालमत्ता केवळ 0.94% इतकी झाली आहे.
टॅग्स:


