वीजपुरवठा खंडित करणाऱ्या उपअभियंत्यावर गुन्हा दाखल

शेवगाव – विधानसभा निवडणुकीच्या महत्वाच्या कामासाठी शेवगाव तहसील कार्यालयात 24 तास विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी दुर्लक्ष केल्याने येथील महावितरणचे उपअभियंता एस. एम. लोहारे यांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी देवदत्त केकाण यांनी निवडणूक कामात दुर्लक्ष केल्याबद्दल लोहारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश बुधवारी दिले. त्यानुसार, तहसील कार्यालयातील लिपीक मनोज जाधव यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात आरोपी लोहारे यांच्या विरोधात फिर्याद दिली.

विधानसभा निवडणुकीचे काम सुरळीत सुरू राहण्यासाठी शेवगाव तहसील कार्यालयात 24 तास वीजपुरवठा सुरूळीत ठेवण्याबाबत उपअभियंता तायडे यांना कळविण्यात आले होते. दि.7 ऑक्‍टोबर रोजी वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे संगणक बंद पडले होते. तर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 11 ऑक्‍टोबर रोजी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट सरमिसळचे कामकाज सुरू असतानाही वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.

वेळोवेळी नोटीस बजावूनही महावितरणने आजपावेतो खुलासा सादर केलेला नाही. त्यामुळे निवडणूक कामात जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी केकाण यांच्या आदेशानुसार उपअभियंता लोहारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुजतीा ठाकरे करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)