उत्तम पिंगळे निवडणूक निकालानंतर तर कित्येकांचे निकालच लागले. कुणी अगदी रसातळाला गेले, कुणाच्या भ्रमाचे भोपळे फुटले, काहींना अचानक धनलाभ व्हावा तसे उज्ज्वल भविष्य वाटू लागले… नमो- म्हणे… 2 से हुये, आते हैं जब, 303 जो जायेगा वो मुकद्दर का सिकंदर, जान-ए-मन कहलायेगा. राहुल यांनी थेट कमिटी समोर मत मांडले… मुझे मत रोको, मुझे जाने दो मुझे मत रोको, मुझे जाने दो… त्यावर कॉंग्रेस कार्यकारिणी समजूत काढतात… अभी ना जाओ छोड़कर कर दिल अभी भरा नहीं आपचे अरविंद तर थक्क झाले व म्हणाले… हाथ में झाडू लेके अभी साफसफाई करना पड़ेगा स्वच्छ भारत में मेरा अभी योगदान देना पडेगा. माया कहें अखिलेश को… मोदीजीकी त्सुनामी में मेरा हाथी भी बचा नहीं तुम्हारी तो साइकल थी, उसका कुछ पता नहीं. स्वत:स किंगमेकर समजणारे चंद्राबाबू – ये क्या हुआ, कैसे हुआ कब हुआ, क्यूँ हुआ जब हुआ, तब हुआ ओ छोड़ो, ये ना सोचो ये क्या हुआ… जेलबंद लालू खूश होऊन म्हणे – अच्छा हुआ इस मुठभेड में मैं तो जेल के अंदर वरना मैं भी बन जाता मुठभेड में बिच का बंदर. दीदी… जाओ रे, जोगी तुम जाओ रे ये है टिएमसी की नगरी यहॉं मारपीट है पूजा सर्व डावे एकत्रित पणे – कोई हमदम ना रहा कोई सहारा ना रहा हम किसी के ना रहे कोई हमारा ना रहा महाराष्ट्रात भाजपा-सेना डोलू लागे… तेरे सुर और मेरे गीत दोनों मिल कर बनेगी प्रीत… जायंट किलर स्मृती इराणी – मी मज हरपून बसले गं, सखी मी मज हरपून बसले गं… मुंबापुरीतून देवेंद्रजी – विजयाला उपमा नाही… हे जनता घरचे देणे, हे जनता घरचे देणे, इंजिन आता भकासपणे… वाट संपता संपेना कुणी वाटेत भेटेना कुठे आलो असा कसा कुणी काहीच सांगेना. द ओन्ली बारामती – लेक लाडकी या घरची, होणार एमपी त्या घरची होणार एमपी दिल्लीच्या धरती. एवढं सर्व पाहून सौ. मुख्यमंत्री म्हणतात… “देवा’, दया तुझी की ही शुद्ध दैवलीला लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला…