हिंगोली (प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे) – हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील सर्वोदय विद्यालय खुडज येथे शिकणाऱ्या तळणी गावातील सुमारे २५ ते ३० विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज पाच ते सहा किलोमीटर शेतातून पायी जावे लागते.मानव विकास अंतर्गत बस सेवा पण बंदच आहे. मानव विकास मिशन अंतर्गत गेल्या तीन-चार वर्षांपासून सर्वोदय विद्यालय खुडज या शाळेतील विद्यार्थिनींना आद्याप सायकलींचे वाटप करण्यात आलेले नाही अशी विचारणा संबंधित शाळा मुख्याध्यापकास केली असता, शाळेच्या मुख्याध्यापकांनी असे उत्तर दिले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सायकल करिता प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवलेला आहे. शासनाने शाळेला सायकली दिल्या नाहीत तर आम्ही काय करणार विद्यार्थ्यांच्या जीविताची जिम्मेदारी आमची नाही असे बोलून शालेय संस्था विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळत असून उडावा उडीवीचे उत्तरे देऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न समस्या दडपण्याचा प्रयत्न करत आहे. मानव विकास अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या सायकली विद्यार्थ्यांना वाटप कराव्यात किंवा शाळेने विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करावी, अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शाळेविरोधात आंदोलन करण्याचा इशारा सेनगाव तालुकाध्यक्ष विनोद खंदारे यांनी दिला आहे.