Satara | विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर करूच नये

सातारा (प्रतिनिधी) – जगाच्या परिसीमा जवळ येत असताना ज्ञानाच्या परिकक्षा ही विस्तीर्ण होत आहेत. या ज्ञानाच्या विस्फोटाचा वापर आपले भविष्य उज्वल करण्यासाठी वापरावे, असे आवाहन पोलीस उप अधीक्षक राजीव नवले साहेब यांनी केले.
अंगापूर, ता. सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूल व नारायणराव गुजाबा कणसे (आप्पा) कनिष्ठ कला महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
प्राचार्य दीपक ढाणे म्हणाले, मोबाईल जवळ असल्यामुळे मुलांचे लक्ष विचलित होते एकाग्रता होत नाही अभ्यासातील लक्ष दुर्लक्षित होते. स्मार्टफोन व माहिती तंत्रज्ञानाचा अतिरिक्त वापर विद्यार्थ्यांच्या कामगिरीतील नकारात्मक सहसंबंध दर्शवीत आहे.
शाळेमध्ये मोबाईल वापरू नये तसेच घरी सुद्धा मुलांनी मोबाईल वापरू नये सोशल मीडियाचे दुष्परिणाम व निर्भया व संरक्षण कसे करावे याची माहिती पोलीस हवालदार पटेल यांनी दिली.
समाजातील व कुटुंबातील आपले स्थान व प्रगती विचारात घेऊन प्रगतीची शिखरे पार करत असताना इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा वापर काळजीपूर्वक करावा त्याचा जीवनात सकारात्मकपणे वापर करावा डायल 112 हा मुलींनी संकट काळात योग्य वापर करावा, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास सोनावले, ए. पी. भुजबळ, पाटील, अपर्णा जाधव व सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.





