पिंपरी | विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाचे ध्येय ठेवावे – प्रा.सुनील चौधरी

पिंपरी, (प्रतिनिधी) – प्रत्येक विद्यार्थ्यांने उच्च शिक्षणाचे ध्येय ठेवून नियमित अभ्यास केल्यास ते जीवनात यशस्वी होतील. शिक्षण घेऊन नोकरी बरोबरच व्यवसायाच्या अनेक संधींचा विचार विद्यार्थ्यांनी करावा, असे मत सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटीचे परीक्षा नियंत्रक प्रा.सुनील चौधरी यांनी व्यक्त केले.
यावेळी भोसरी, मोशी व चिंचवड येथील तेली समाजातील महिलांचे संताजी संकल्प बचत गट, संताजी उत्कर्ष महिला बचत गट, संताजी नारीशक्ती बचत गट, संताजी नवचेतना बचत गट, संताजी सखी स्वयं सहाय्य्यता बचत गट अशा पाच महिला बचत गटांनी एकत्र येऊन महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचा संकल्प केला.
तर समाजातील होतकरू व गरजवंत असलेल्या पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयाची शिष्यवृत्ती यावेळेस देण्यात आली.तसेच यावेळी 10 वी 12 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
पिंपरी चिंचवड शहर तेली समाजाच्या वतीने चिखली येथील दत्तगुरु सभागृहात आयोजित कौटुंबिक मेळावा, महिला बचत गट उद्घाटन व गुणवंत विद्यार्थी सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर तेली समाजाचे शहराध्यक्ष शिवराज शेलार, कौटुंबिक मेळावा अध्यक्ष ऋषिकेश देशमाने, सुदुंबरे येथील श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्थेचे अध्यक्ष शिवदास उबाळे, उद्योजक नरेंद्र मेहेर,
पोपटकाका पिंगळे, दत्ता उबाळे, वसुंधराताई उबाळे, संजय शेलार, प्रदीप उबाळे, दिनेश उबाळे, शिवाजी अंबिके, अमित शिंदे, संजय जगनाडे, संदीप चिलेकर, अनिल चौधरी, लक्ष्मण शेलार, अभिजीत डोळसे, दिनेश दिवटे, मनोज आणेकर, सचिन नाटेकर, सुदाम चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन जगनाडे आणि हनुमंत काळे यांनी केले.तर संजय जगनाडे यांनी आभार मानले.





