हडपसर, दि. 28 – शाडू मातीची गणेशमूर्ती वापरणे ही काळाची गरज आहे. असे पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे गरजेचे आहे, असे मत प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी व्यक्त केले.
साधना विद्यालय व आर.आर. शिंदे ज्यु. कॉलेज, हडपसर येथे राष्ट्रीय हरित सेना योजनेमार्फत शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या उपक्रमाचे आयोजन पर्यवेक्षक दिलीप क्षीरसागर, शिवाजी मोहिते यांनी केले होते. कार्यशाळेस खेडचे गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे यांनी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विज्ञान विभाग प्रमुख धनाजी सावंत, राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख शैलेश बोरुडे, साधना खोत, नितेश मुजुमले, सविता माने यांनी केले. अशा एकूण 50 गणेशमूर्ती कार्यशाळेत तयार करण्यात आल्या.