पिंपरी | गंगा नगर मित्र मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार

पिंपळे गुरव, (वार्ताहर) – जुनी सांगवी येथील गंगा नगर मित्र मंडळाच्या वतीने गंगा नगर येथे अंगारकी चतुर्थी उत्साहात साजरी करण्यात आली.
गंगा नगर मित्र मंडळाच्या वतीने अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधत दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.यामध्ये एकूण ४२ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच भेट वस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी परिसरातील नागरिकांनी मंगळवारी (दि. २५) रात्री साडे दहा वाजता आरती समयी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी अध्यक्ष श्रीराज काकडे, उपाध्यक्ष अविनाश देशपांडे, कार्याध्यक्ष मोहीत लोंढे, दत्ता यनपुरे,
आप्पा ठाकर, संदीप कीर्दक, अंतीम घोरपडे, श्रीकांत वर्पे, ओंकार पोंगडे, विवेक बोकन, रोहीत पाटील, तेजस पाटील आदी पदाधिकारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहित लोंढे यांनी केले. शुभम मुळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.





