चाचणी परीक्षेदरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू

नवी मुंबई: दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनीचा वाशीतील मॉर्डन स्कूलमध्ये मृत्यू झाला आहे. सायली अभिमान जगताप असे या मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. सायलीची चाचणी परीक्षा सुरु होती. मंगळवारी सकाळी सायली परीक्षा देण्यासाठी शाळेमध्ये गेली असता हा प्रकार घडला. सायलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, अभ्यासाच्या ताणातून तिचा मृत्यू झाल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे

सायली जगताप मंगळवारी सकाळी परीक्षेसाठी शाळेमध्ये गेली होती. परीक्षा सुरु असलेल्या वर्गामध्ये ती बॅग घेऊन गेली. त्यामुळे शिक्षकाने तिला बॅग वर्गाबाहेर ठेवण्यास लावली. बॅग ठेवण्यासाठी सायली वर्गाबाहेर गेली असता त्याठिकाणी ती चक्कर येऊन खाली पडली. दरम्यान, उपस्थित शिक्षक सायलीला उलचून ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात घेऊन गेले. मात्र उपचारापूर्वी डॉक्‍टरांनी तिला मृत घोषीत केले. सायलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालातूनच तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कारण स्पष्ट होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)