पिंपरी | विद्यार्थी युक्रेनमध्ये साजरा करताहेत गणेशोत्सव

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – युक्रेन-रशिया या दोन देशा मध्ये चाललेल्या युध्द परिस्थितीमध्ये देखील युक्रेनमध्ये राहणाऱ्या तेजस किरण धनशेट्टी यांनी गणेशोत्सव साजरा केला. पुणे येथील शनिवारवाड्य़ाची प्रतिकृती साकारत मित्रा समावेत गणेशोत्सव उत्साहात साजरा केला.
येथील गंगाधर गणपत धनशेट्टी याचे नातू तेजस किरण धनशेट्टी भारतामधून वर्ष २०२१ ला युक्रेन या देशात MBBS या शिक्षणासाठी गेले आहेत. त्याच दरम्यान युक्रेन-रशिय या दोन देशा मध्ये चाललेल्या युध्द परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण करत आहेत.
विद्यार्थामध्ये तेजस धनशेट्टी यांच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांच्या समवेत गणेशउत्सव साजरा करण्यात आला.
त्यामध्ये विद्यार्थ्यांनी पुण्यामधिल शनिवारवाड्य़ाची प्रतिकृती तयार केली. गणेश उत्सवाच्या कार्यक्रमामधून भारतीय विद्यार्थी तेथील स्थानिकांना भारतीय संस्कृती, सणांची माहिती देत आहेत. विद्यार्थ्यांचा या उपक्रमास तेथील स्थानिक नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.




