नको फास मांजाचा! मानवी रचनेतून पतंग साकारत विदयार्थ्यांची जनजागृती
Updated On:

पुणे – मकर संक्रांतीला पतंग उडविण्याची आपली परंपरा आहे. परंतु, बहुतांश ठिकाणी बंदी असलेला चिनी व नायलॉन, सिंथेटिक मांजा वापरण्यात येतो. या मांजाने अनेक जण गंभीर जखमी होण्याबरोबरच शेकडो पक्ष्यांना जीव गमवावा लागला आहे. याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेत विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. त्यासाठी मानवी रचनेतून रंगीबेरंगी पतंगाचा आकार साकारण्यात आला आहे.













