Pimpri : किवळेत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात

रावेत : संकल्प सोशल फाउंडेशन आणि बापु दिनकर कातळे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘विद्यार्थी गुणगौरव सोहळा’ मोठ्या उत्साहात पार पडला.
बापदेव महाराज लॉन्स येथे झालेल्या या कार्यक्रमात दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बापु दिनकर कातळे यांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन झाले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सन्मान म्हणून त्यांना सायकल, घड्याळ आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. सायकल शारीरिक आरोग्यासाठी, तर घड्याळ वेळेच्या व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात आले होते.
यावेळी मार्गदर्शन करताना बापु दिनकर कातळे म्हणाले की, यशस्वी होण्यासाठी सकारात्मक विचार, सातत्यपूर्ण अभ्यास आणि वेळेचे नियोजन महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षक, शाळा आणि पालकांचे संयुक्त योगदान असते,” असे ते म्हणाले.
ह.भ.प. शेखर महाराज जांभुळकर यांनी पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मुलांशी मैत्रीपूर्ण नातं जोपासा आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव द्या. त्यांच्यावर विश्वास ठेवा.





