अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी धडपड
Updated On:
कृषि, पायाभूत सुविधा क्षेत्रांसाठी विक्रमी तरतुदींची घोषणा
नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेला दशकभरातील सर्वांत मोठ्या मंदीच्या सावटाखालून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यापार्श्वभूमीवर, अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारच्या चालू असलेल्या धडपडीचे प्रतिबिंब शनिवारी मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पातून उमटले.
अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशातून कृषि आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांवर विक्रमी खर्च करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.




