मुंबई : खासगी क्षेत्रातील बँकांनी 2025-26 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) जोरदार कामगिरी केली आहे. ICICI Bank चा निव्वळ नफा 15.5% वाढून ₹12,768 कोटींवर पोहोचला आहे. बँकेच्या डिपॉझिट आणि रिटेल कर्ज वाढीतही मजबुती दिसून आली. बँकेची सरासरी ठेवी 11.2% वाढून ₹15.33 लाख कोटींवर गेल्या असून CASA रेशो 38.7% आहे. ICICI ची नेट इंटरेस्ट इनकम (NII) 10.6% वाढून ₹21,635 कोटी झाली आहे. बँकेचा NIM 4.34% वर असून ग्रॉस NPA 1.67% आणि नेट NPA 0.41% पर्यंत खाली आला आहे. कोअर ऑपरेटिंग प्रॉफिटही 13.6% वाढून ₹17,505 कोटी झाला आहे. दरम्यान, देशातील सर्वात मोठ्या खासगी बँक HDFC Bank ने ₹18,155 कोटींचा निव्वळ नफा जाहीर केला आहे, जो 12.2% वाढ दर्शवतो. बँकेने प्रति शेअर ₹5 चा विशेष अंतरिम डिव्हिडेंड आणि 1:1 बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय HDB फायनान्शियल सर्व्हिसेसच्या IPO मधून ₹9,128 कोटींचा प्री-टॅक्स नफा मिळाला आहे. Yes Bank ने देखील 59% नफावाढीसह ₹801 कोटी निव्वळ नफा कमावला आहे. बँकेचा NIM 2.5% असून CASA रेशो 32.8% वर पोहोचला आहे. बँकेच्या बॅलन्स शीट आणि एसेट क्वालिटीमध्येही लक्षणीय सुधारणा झाली आहे. या बँकिंग रिझल्ट्समुळे शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण असून गुंतवणूकदारांचे लक्ष बँकिंग शेअरकडे वळले आहे.