Munjya Film on Actress Sharwari| अभिनेत्री शर्वरीचा ‘मुंज्या’ या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवसांपासूनच बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. या चित्रपटाचे यश पाहून शर्वरीने आनंद व्यक्त केला आहे. कोकणातील लोककथेवर आधारित तिच्या या चित्रपटाने प्रेक्षकांना थिएटरकडे ज्या पद्धतीने आकर्षित केल्याचे पाहून तिला आनंद झाला आहे. “मला महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान आहे, त्यामुळे मराठी लोककथेवर आधारित चित्रपटाला मिळणारं इतकं प्रेम पाहून आणि लोक त्याचं कौतुक करत आहेत हे पाहणं खूप छान वाटतंय. महाराष्ट्रीय लोककथा राष्ट्रीय स्तरावर गाजत आहेत आणि त्यावर बनलेला एक चित्रपट हिट होतोय, हे पाहून मला खूप आनंद होत आहे. माझ्या खात्यात मोठे यश येणे अर्थातच माझ्यासाठी एक मोठा आत्मविश्वास वाढवणारा आहे. माझा सोशल मीडिया संपूर्ण देशभरातून प्रेमाचा वर्षाव होत आहे. ही माझ्या कामाचीही मोठी पोचपावती आहे.” ती पुढे म्हणते, “मुंज्यामधी माझं गाणं तरस हा प्रेक्षकांना कसा वाटेल याबद्दल मला खात्री नव्हती. परंतु लोक त्यावर नाचत आहेत आणि थिएटरमध्ये गाण्याचा आनंद घेत आहेत हे पाहणे माझ्यासाठी खूप आनंदाचे आहे. मी मोठी होत असताना, चित्रपटाच्या शेवटी डान्स नंबर पाहण्यासाठी मी जागेवरून हलायचे नाही आणि आता लोक थिएटरमध्ये माझ्या गाण्यांचा आनंद घेत आहेत हे पाहणं खूपच सुख देणार आहे,” असे म्हणत शर्वरीने तिचा आनंद व्यक्त केला. Munjya Film on Actress Sharwari| दरम्यान, ‘मुंज्या’ने रिलीजच्या अवघ्या चार दिवसांत 20 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे बजेट 30 कोटी रुपये आहे, त्यामुळे हा चित्रपट आपला खर्च वसूल करण्याच्या अगदी जवळ आहे. पुढील काही दिवसांत चित्रपटाच्या कमाईचा आणखी वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. Munjya Film on Actress Sharwari| ‘मुंज्या’ ची निर्मिती दिनेश विजन यांनी केली आहे. तर दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलेआहे. ‘मुंज्या’मध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग आणि अभय वर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सध्या या कलाकरांचे प्रेक्षकांकडून कौतुक केले जात आहे. Munjya Film on Actress Sharwari| हेही वाचा: अन्न, वस्त्र, गृहनिर्माण, शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित महत्त्वाची मंत्रालये कोण सांभाळणार?