Nagar : मत्स्यशेती संवर्धनातून शेतकरी समृध्दीसाठी प्रयत्न; विवेक कोल्हे

कोपरगाव ; शेतीला जोडधंदा उपलब्ध करून देण्यासाठी शेततळ्यातील मत्स्यशेती संवर्धनावर भर देत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमी खर्चात बायोफ्लॉक्स मत्स्य शेती संवर्धनातून शेतकरी समृध्दीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले. बायोफ्लॉक्स मत्स्य शेतीसंदर्भात लवकरच तरूण उद्योजकासह शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही ते म्हणाले.
तालुक्यातील शिंगणापूर येथे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थळावर संजीवनी फार्मर्स फोरम, संजीवनी मत्स्य संस्था, मत्स्य व्यवसाय विभाग अहिल्यानगर व बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने एकदिवसीय मत्स्य शेती संधी व सुविधा यावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रारंभी संजीवनी मत्स्य संस्थेचे अध्यक्ष कारभारी लबडे व कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपक्रमाचे प्रमुख संजीव पवार यांनी प्रास्तविकात गेल्या वर्षभरात मत्स्य शेती संदर्भात केलेल्या प्रयोगासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
याप्रसंगी अहिल्यानगर मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त रमेशकुमार घडील यांनी पंतप्रधान मत्स्य संपदा व नॅशनल फिशरीज डिजीटल उपक्रम अंतर्गत विविध योजनेची माहिती देऊन तरुण उद्योजकांसह शेतकऱ्यांनी मत्स्यशेतीत मोठ्या संख्येने सहभाग घेत स्वतःबरोबरच परिसराची आर्थिक क्रयशक्ती वाढवावी, असे आवाहन केले. विकास कांबळे यांनी बायोफ्लॉक्स मत्स्यशेतीबाबत मार्गदर्शन केले. प्रतिक्षा पाटेकर यांनी प्रयोगात्मक शेतीची माहिती दिली. बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक महेश कानविंदे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध शेती कर्जाबाबत माहिती देत मत्स्य संवर्धनातून कोपरगावचा नावलौकीक वाढवावा, असे आवाहन केले. कोपरगाव शाखेचे व्यवस्थापक सुरेश यादव यांनीही शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान केले. उदगीर येथील मत्स्य महाविद्यालयाचे डॉ. अजय कुलकर्णी यांनी ऑनलाईन पध्दतीने शेततळ्यातील मत्स्यशेती संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक त्रंबकराव सरोदे, रमेश आभाळे, रमेश घोडेराव, बाळासाहेब वक्ते, निवृत्ती बनकर, मनेष गाडे, विलासराव वाबळे, बाळासाहेब संधान, शिवाजीराव कदम, ज्ञानेश्वर होन, संजय औताडे, ज्ञानदेव औताडे, सतिष आव्हाड, विलासराव माळी, डॉ गुलाबराव वरकड, बाळासाहेब शेटे, प्रकाश सांगळे,कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अंबादास देवकर, विष्णुपंत क्षीरसागर, संभाजी रक्ताटे, सोपानराव कासार, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, योगेश इंगळे, एचआर मॅनेजर विशाल वाजपेयी, केन मॅनेजर जी. बी. शिंदे, ऊस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर यांच्यासह विविध संस्थांचे अध्यक्ष, आजी-माजी संचालक, संजीवनी मत्स्य संस्थेचे सर्व मत्स्य उत्पादक शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





