गड-किल्ल्यांवर दारू पिणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई; राज्य सरकारने उचलले मोठे पाऊल

State-Government Decision | राज्य सरकारकडून गड-किल्ल्यांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. गडकिल्ले आणि प्राचीन ठिकाणी जाऊन मद्यपान केल्याच्या, वास्तूंचे नुकसान केल्याचे प्रकार राज्यात घडत आहेत. याला पायबंद घालण्यासाठी आता कायदा केला जाणार आहे.
यासंदर्भातील सुधारणा विधेयक कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सादर केले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तू शास्त्र विषयक स्थळे विशेष सुधारणा विधेयक विधानसभेत सादर केले आहे.
याद्वारे आता किल्ल्यावर हुल्लडबाजी आणि दारू पार्टी करणाऱ्यांना शिक्षा केली जाणार तसेच त्यांना १ लाख रुपयांचा दंड देखील ठोठवला जाणार आहे. गड- किल्ल्यांचं पावित्र्य राखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेतल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारचं अभिनंदन केले आहे.
गड-किल्ले आणि आपला सांस्कृतिक वारसा संरक्षित करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय !
प्राचीन स्मारकांवर दारू पिणाऱ्यांसंदर्भात सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. यापुढे गड-किल्ल्यांवर अशा गैरकृत्यांसाठी १ लाख रुपये दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
हा निर्णय ऐतिहासिक स्थळांचे रक्षण आणि…
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) December 16, 2024
छत्रपती संभाजीराजे यांनी काय म्हंटले?
छत्रपती संभाजीराजे यांनी ट्वीट करत लिहिले की, गड-किल्ले आणि आपला सांस्कृतिक वारसा संरक्षित करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय !प्राचीन स्मारकांवर दारू पिणाऱ्यांसंदर्भात सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. यापुढे गड-किल्ल्यांवर अशा गैरकृत्यांसाठी १ लाख रुपये दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
हा निर्णय ऐतिहासिक स्थळांचे रक्षण आणि त्यांचे पावित्र्य राखण्यासाठी मोलाचा ठरेल. आता फक्त कायदा नव्हे, तर त्याची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तसेच, प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की आपण ऐतिहासिक वारसा भावी पिढ्यांसाठी जतन करू. सरकारचे अभिनंदन आणि इतिहासप्रेमींकडून पूर्ण पाठिंबा ! गड किल्ले स्वच्छ, सुरक्षित आणि पवित्र ठेवूया ! आपला वारसा, आपली ओळख,” असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, ख्रिसमस आणि वर्षअखेर दिवस साजरा करण्यासाठी अनेकजण गड किल्ल्यावर जाऊन तेथे दारू पार्टी करत असल्याची घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखलं जात नाही. परंतु आता गड-किल्ल्यांवर मद्यसेवन करुन गैरकृत्य केल्याचे आढळून आल्यास मोठी कारवाई केली जाणार आहे.
हेही वाचा:
हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस; विविध मुद्यांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता





