Entertainment । अभिनेता राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर चित्रपट ‘स्त्री 2’ प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा निर्माण करत आहे. येत्या १५ आगस्टला चित्रपटगृहात हा चित्रपट दाखल होणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचे पहिले गाणेही रिलीज झाले आहे. नोरा फतेही 2018 मध्ये आलेल्या ‘स्त्री’ चित्रपटात ‘कमरिया’ गाण्यावर डान्स करताना दिसली होती. आता अभिनेत्री तमन्ना भाटिया ‘स्त्री 2’ मध्ये तिच्या सौंदर्याची झलक दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘आज की रात’ असे तिच्या गाण्याचे नाव आहे. गाण्याच्या सुरुवातीलाच तमन्नासह पंकज त्रिपाठी, राजकुमार राव, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी देखील दिसत आहे. तमन्ना तिच्या डान्स आणि मूव्ह्सने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तिची शैली खूपच आकर्षक आहे. दरम्यान सोशल मोदींवर तिचे गाणे व्हायलर होत असून यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. काहींनी या गाण्याचे कौतुक केले आहे तर काहींनी गाण्याला आयटम साँग कमी आणि कव्वाली जास्त असे म्हटले आहे. हे गाणे अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहे. काही दिवसांपूर्वीच ‘स्त्री 2’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. ‘स्त्री 2’ पाहण्यात प्रेक्षकांना दुप्पट मजा येणार असल्याचे ट्रेलरवरून स्पष्ट झाले होते. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरसोबतच अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी, सुनीता राजवार आणि अभिषेक बॅनर्जी हे स्टार्स या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.