Strait Of Hormuz : ‘होर्मुझ बंद आहे, ताबडतोब परत जा’, इराणी सैन्याने भारतीय जहाजाला माघारी धाडले ; ऑडिओ व्हायरल
Strait Of Hormuz : इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) काल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या एका भारतीय जहाजाला अडवले

Strait Of Hormuz : इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) काल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या एका भारतीय जहाजाला अडवले आणि त्याला तात्काळ बंदरात परतण्याचा आदेश दिला. एका ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये भारतीय जहाजाचा कॅप्टन आणि इराणी नौदलाचा कॅप्टन यांच्यातील संपूर्ण संभाषण कैद झाले आहे.
एका इराणी (आयआरजीसी) अधिकाऱ्याने भारतीय जहाजाच्या कॅप्टनला स्पष्टपणे सांगितले की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक प्रतिबंधित आहे आणि त्यांनी तात्काळ आपल्या बंदरात परतावे. त्यानंतर तो इराणी अधिकारी, “तात्काळ परत जा.” असे म्हणाला.
भारतीय कॅप्टनने उत्तर देत, “ठीक आहे. मी पुन्हा सांगतो, होर्मुझची सामुद्रधुनी अजूनही बंद आहे, ठीक आहे, साहेब.” त्यानंतर आयआरजीसीच्या नौदलाच्या कॅप्टनने उत्तर दिले, “ठीक आहे .” म्हटले आहे.
‘भाग्यलक्ष्मी’ जहाजाला परत पाठवले Strait Of Hormuz :
जहाजाने तात्काळ आपला मार्ग बदलला. ‘भाग्यलक्ष्मी’ जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी हे संपूर्ण संभाषण इराणी नौदलाला सांगितले. या ऑडिओपूर्वी, इराणी गनबोट्सनी भारतीय ध्वज असलेल्या दोन जहाजांवर गोळीबारही केला होता. ही जहाजे इराकी तेल घेऊन जात होती. तथापि, या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
भारताने इराणी राजदूतांना बोलावले
या संपूर्ण घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत, भारत सरकारने इराणी राजदूतांना बोलावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने नवी दिल्लीतील इराणी राजदूतांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. बैठकीदरम्यान, भारताच्या परराष्ट्र सचिवांनी आपली चिंता स्पष्टपणे व्यक्त केली.
‼️‼️🇮🇷 BREAKING | The IRGC tells the cargo vessel “Bhagya Laxmi” to turn back from the Strait of Hormuz, as it does not have permission to cross.
The vessel complies and turns back.
Bhagya Laxmi (IMO: 9351816) has an all-Indian crew. Under tha flag of Antigua & Barbuda or the… pic.twitter.com/Caakki67Cl
— Global Spectrum (@GlobalSpectrum_) April 18, 2026
त्यांनी सांगितले की, शनिवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय ध्वज असलेल्या दोन जहाजांवर झालेला गोळीबार ही एक अत्यंत गंभीर बाब आहे. परराष्ट्र सचिवांनी हे देखील आठवण करून दिली की, इराणने यापूर्वी भारताकडे जाणाऱ्या एका जहाजाला सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी मदत केली होती. त्यामुळे, इराण सहकार्य करेल अशी अजूनही आशा आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद Strait Of Hormuz :
एका इराणी अधिकाऱ्याने सांगितले होते की, आयआरजीसी (IRGC) सोबत समन्वय साधल्यानंतरच सर्व जहाजे जाऊ शकतात. इराणी परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले की, लेबनॉन आणि इस्रायल यांच्यातील शस्त्रसंधी करारानंतर हा मार्ग खुला झाला आहे.
अराघची यांच्या वक्तव्यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जहाजांची वाहतूक वाढली, परंतु इराणी बंदरांवर सुरू असलेल्या अमेरिकेच्या आर्थिक नाकेबंदीच्या निषेधार्थ आयआरजीसीने हा सामरिक जलमार्ग पुन्हा बंद केला आहे.






