Pune Crime News : पुणे शहरातील पाटील इस्टेट परिसरात रविवारी रात्री दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर तुफान राड्यात झाले. या घटनेत काही वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद अचानक उग्र झाला. दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांवर दगडफेक करत परिसरात उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे नुकसान केले. काही वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या, तर रस्त्यावर मोठा गोंधळ निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर जमाव पांगवण्यात आला. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवली जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे पाटील इस्टेट परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. हेही वाचा: US Iran War: ‘अमेरिकेनेच अंतिम मुदत ठरवली अन् स्वतःच पळ काढला”; इराणची खोचक टीका