Stock Market : आरबीआयच्या पतधोरण निर्णयापूर्वी शेअर बाजार सपाट; सेन्सेक्स 14 अंकांनी वधारला
Stock Market : बीएसईचा ३० समभागांचा सेन्सेक्स १३.८४ अंकांनी (०.०२ टक्के) वाढून ७४,३६०.०१ अंकांवर स्थिरावला.

Stock Market : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या (एमपीसी) शुक्रवारी होणाऱ्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तसेच पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याने गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजारात चढ-उताराचे सत्र पाहायला मिळाले. अखेरीस सेन्सेक्स आणि निफ्टी किरकोळ वाढीसह जवळपास सपाट पातळीवर बंद झाले.
बीएसईचा ३० समभागांचा सेन्सेक्स १३.८४ अंकांनी (०.०२ टक्के) वाढून ७४,३६०.०१ अंकांवर स्थिरावला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने ७४,५४४.२४ अंकांचा उच्चांक आणि ७३,८०७.३० अंकांचा नीचांक गाठला. दिवसभरात निर्देशांकात तब्बल ७३६.९४ अंकांची चढ-उतार नोंदविण्यात आली. (Stock Market)
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०.९५ अंकांनी (०.०५ टक्के) वाढून २३,४१६.५५ अंकांवर बंद झाला.
कोणते शेअर्स वाढले-घसरले ? (Stock Market )
सेन्सेक्समधील वाढलेल्या समभागांमध्ये टायटन, इटरनल, आयटीसी, टेक महिंद्रा, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय बँकेचा समावेश होता. दुसरीकडे इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक आणि अदानी पोर्ट्स यांच्या समभागांमध्ये घसरण झाली.
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) बुधवारी ५,६१६.५६ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केल्याची माहिती शेअर बाजाराकडून देण्यात आली.
सावध वातावरण कायम – (Stock Market )
लाइव्हलाँग वेल्थचे संस्थापक आणि संशोधन विश्लेषक हरिप्रसाद के. यांनी सांगितले की, कमकुवत जागतिक संकेत, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि मध्यपूर्वेतील भूराजकीय तणावामुळे बाजाराची सुरुवात दबावाखाली झाली होती. मात्र महत्त्वाच्या आधार पातळ्यांवर खरेदी वाढल्याने निर्देशांकांनी दिवसातील बहुतांश तोटा भरून काढला. तरीही आरबीआयच्या पतधोरण निर्णयापूर्वी गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीचे वातावरण कायम राहिले.

Stock Market : आरबीआयच्या पतधोरण निर्णयापूर्वी शेअर बाजार सपाट; सेन्सेक्स 14 अंकांनी वधारला
आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव १.६८ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ९६.१७ डॉलरवर आला.
आशियाई बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई, चीनचा शांघाय एसएसई कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक घसरणीसह बंद झाला. युरोपातील बहुतांश बाजारांमध्ये मात्र वाढ दिसून आली. अमेरिकेतील शेअर बाजार बुधवारी तोट्यात बंद झाले होते.
दरम्यान, बुधवारी सेन्सेक्स ३०३.६७ अंकांनी घसरून ७४,३४६.१७ अंकांवर, तर निफ्टी ७७.९५ अंकांच्या घसरणीसह २३,४०५.६० अंकांवर बंद झाला होता.






